shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकरच्या ग्रामसभेत आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी, खडाजंगी...तर राजीनामे द्या - शिंदे

सरपंचपती व सदस्यपतीच्या हस्तक्षेपामुळे विकासाला खिळ - सागर आहेर

श्रीरामपूर/प्रतिनिधी 
जलजीवन योजनेचे काम प्लॅन प्रमाणे काम चालू नाही, रस्ता सोडून शेतातून मुख्यवाहीनी का घेतली? उन्हाळा असून ही गावतळे का भरले नाही? मुख्य वाहीनीचे कनेक्शन का तोडले नाही? जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, जूनी योजना पुर्ण नसताना वाढीवला मंजूरी देवू नका. घनकचरा चे काम अपुर्ण आहे ते पुर्ण करून घ्या, केबलचे काम निकृष्ट आहे यात ग्रामपंचायतीने लक्ष का घातले नाही? अशा विविध प्रश्नाच्या सरबत्तीने ग्रामसभा गाजत असतानाच परिवर्तनचे मार्गदर्शक रामदास शिंदे यांचे राजीनामे मागणीने व उपसरपंच सागर आहेर यांचे यांच्या सरपंचपती व सदस्यपतीच्या हस्तक्षेपामुळे गावचा विकास खुंटला असल्याच्या खुुलाशाने सत्ताधार्‍यांना अडचणीत घरचा आहेर मिळाल्याने ही ग्रामसभा चांगलीच गाजली असली तरीही सरपंच सौ.शितल पटारे यांनी चुकीच्या कामांवर कठोर कारवाईच्या खुलाशाने शेवट शांततेत झाला.   


श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री क्षेत्र रेणुकामाता प्रांगणात नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत चांगलीच खडाजंगी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.शितलताई पटारे या होत्या तर ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, उपसरपंच सागर आहेर, सौ.ज्योती डूकरे, अशोकचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, रामदास शिंदे, भाऊराव सुडके, प्रताप पटारे, सतीष शेळके, राहुल अभंग, सागर शिंदे, सुरेश अमोलीक, गीरीष मते, संदिप गांधले, आप्पासाहेब जाधव, संदिप गांधले, गणेश कांबळे, सम्राट माळवदे, सुर्यभान शेळके, भागवतराव पटारे, वेणुनाथ डूकरे, काळू गायकवाड, सुनिल विधाटे, राजेंद्र चौधरी व पोलीस पाटील बाबासाहेब साळवे आदि प्रमुख व्यासपिठावर उपस्थीत होते.
भोकर ग्रामपंचायतीत सध्या कार्यरत असलेले सर्व सदस्य उच्चशिक्षीत व तरूण आहेत, तुमच्या भरवश्यावर आम्ही जनतेची दारे झिजविताना दिलेली आश्वसनाची पुर्ती होणे गरजेचे आहे. तरी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर निवडणुकीतील आश्वासनांची पुर्ती कशी होणार? प्रत्येक घटकाला पाणी मिळाले पाहीजे. चुकीची कामे होत असतील तेथे कुणालाही पाठीशी घालू नका अशा वेळी आम्ही व जनता तुमच्या पाठीशी आहे. प्रसंगी अधिकारांचा वापर करा पण जनतेचे प्रश्न सोडवा, उडवाउडवीची उत्तरे देवू नका, कामे करा अन् 
कामे होत नसतील, प्रश्न सुटत नसतील तर ग्रामविकास अधिकार्‍यांसह सर्वांनीच राजीनामे द्या अशी मागणी परीवर्तन पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक रामदास शिंदे यांनी केली, तर जे पदावर नाहीत त्यांनी चिरीमिरीसाठी ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, येथे सध्या सरपंचपती व सदस्यपती यांचे हस्तक्षेपामुळे गावच्या विकासाला खिळ बसली असल्याचा खुलासा उपसरपंच सागर आहेर यांनी केल्याने ग्रामसभेत एकच खळबळ उडाली होती.
ग्रामपंचायत विरोधात गेल्यापासून नेहमीच आक्रमक असलेले भाजपाचे भाऊराव सुडके यांनी कडक उन्हाळा असताना, पाटपाण्यासाठी खर्च दाखविता मग मे महिन्याचे शेवटचे आवर्तन असताना गावतळ्यात पाणी का भरले नाही? गावच्या इतिहासात पहील्यांदाच उन्हाळ्यात गावतळे भरले गेले नाही. आम्ही प्रसंगी राज्य मार्गावर रास्ता रोको केला पण गावतळे भरले, मग तुम्ही का भरले नाही? असा संतप्त सवाल करत टेलटँकहुन येणार्‍या व इतर टाक्यांच्या मुख्य वाहीनीला सत्ताधार्‍यांच्या बगलबच्च्यांचे कनेक्शन आहे ते का तोडले नाही? त्यामुळे इंदिरानगर व शिंदे वस्तीला पाणी असून ही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. स्वतंत्र विहीर मोटार पाईपलाईन असताना चार - चार दिवस पाणी येत नसल्याचा खुलासा भाऊराव सुडके, भाऊसाहेब शिंदे, बाबासाहेब पेहेरे व सागर शिंदे यांनी केला त्यावर सरपंच सौ.शितल पटारे यांनी संबधीतांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देत पाणी सुरळीत करून देण्याचे आश्वासन देत उपस्थीतांना शांत केले.
घणकचरा निर्मूलनचे काम अद्याप अपुर्ण आहे, अनेक ठिकाणी खड्डे अपुर्ण आहेत ते काम पुर्ण झाले शिवाय बिल अदा करू नका. गावात केबल टाकण्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे चालले आहे, अनेक ठिकाणी केबलची उंची कमी आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे, या बाबत वर्तमानपत्रात बातम्या येवून ही कामात दुरूस्ती नाही. खांबांना दिलेले ताण लुज आहेत यात ग्रामपंचायतीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सतीष शेळके यांनी सांगीतले.
हनुमानवाडी पाणी पुरवठा योजनेसह इतर योजनाची मुख्यवाहीनी देखभाल दुरूस्तीच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेने घेणं आवश्यक असताना शेतातून घेण्याचे कारण काय?  भविष्यात संबधीतांचे पिकं उभी असताना बिघाड होवून दुरूस्ती करण्याची गरज भासली तर काय करणार? यासाठी या पाईपलाईन आत्ताच संबधीत ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडे करून घ्या अशी सुचना रामदास शिंदे यांनी केली तर सध्या गावतळ्यात पाणी भरलेले नसल्याने गावात तीव्र पाणी टंचाई असताना टाकळीभान येथील विठ्ठल जाधव या शेतकर्‍यांकडून आपल्या गावाला विनामोबदला बोअरचे पाणी मिळाले त्यामुळे गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी आता गावचे पाण्याचे योग्य नियोजन करा तसेच संबधीत शेतकरी विठ्ठल जाधव यांचे आभाराचा ठराव यावेळी अशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी मांडला.
आम्ही अर्ज देवून दोन महिने झाले तरी पाणी मिळेना, व्हॉल्व टाकून मिळेना, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हनुमानवाडी पाणी पुरवठ्याकडे लक्ष देईना असे विकास भोईटे यांनी सांगताच हनुमानवाडी येथील काही नागरीकांनी विनाकारण ग्रामपंचायत कर्मचार्‍यास मारहाण केल्याची घटना घडल्याचा खुलासा कर्मचारी बनिचंद आहीरे यांनी ग्रामसभेत केला. गेल्या आवर्तनात गावतळ्यात पाणी सोडताना ग्रामपंचायतीचा कुठलाच पदाधिकारी हजर नव्हता, आम्ही दिवसरात्र जागुन गावतळे भरले, त्यावेळी कुणाला बाहेरचा हस्तक्षेप वाटला नाही मग विकास कामात इतरांचा हस्तक्षेप कसा? असा सवाल सरपंच पती प्रताप पटारे यांनी उपस्थीत केला. यावेळी उपसरपंच व सरपंचपती यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाली. यावेळी नानासाहेब तागड यांनी १५ चारीच्या कडेच्या वडजाई रोडवर मुरूम टाकून देण्याची मागणी केली.

भोकर गावात सर्व कामे व्यवस्थीत सुरू आहेत. ग्रामसभेत आरोप प्रत्यारोप हे चालतच राहणार आहेत, परंतू सध्याची पाणी टंचाई ही कशामुळे आली याचा सर्वांनी विचार करा. पाणी टंचाईचे मुळ कारण वृक्षतोड ही आहे. त्यामुळे यावर्षी गावातील प्रत्येक नागरीकाने किमान एक झाड लावा व त्याचे संवर्धन करा म्हणजे भविष्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही असे सांगत असतानाच ज्यांचेकडे अनाधिकृत कनेक्शन असतील ते तातडीने तोडले जातील, मुख्यवाहीनेचे कनेक्शन ही तोडण्याची मोहिम हाती घेवू प्रसंगी पोलीसांची मदत घेवून कडक कारवाई केली जाईल असा इशारा लोकनियुक्त सरपंच सौ.शितलताई पटारे यांनी केला.
यावेळी गंगाराम गायकवाड, वाल्मीक जाधव, सुरेश अमोलीक, भास्कर डूकरे, भास्कर गायकवाड, नामदेव तागड, नामदेव वाकडे, प्रकाश आहेर, श्रेयस शिंदे, आकाश शिंदे, सलीम पठाण, रमेश साठे, राम न्हावले, पोपट मांजरे, मोहन पांढरे, संजय डूकरे, लहानु विधाटे, ठकसेन खंडागळे, भारत छल्लारे, इंद्रभान दिवटे, राजू लोखंडे,आबासाहेब काळे, भाऊसाहेब शिंदे, प्रसाद ओहोळ, गणेश शेळके, विलास डूकरे, मारूती डूकरे, रमेश भालके, सोपान शेजूळ, नितीन मते, आप्पासाहेब खैरे, ख्वााजामिया शेख आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111
close