shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पत्रकारांच्या लेखणीमुळे समाज सुरक्षित - डाॅ. आण्णासाहेब बाचकर


विद्यापीठात राज्यस्तरीय
 पुरस्काराचे वितरण  संपन्न 

राहुरी / प्रतिनिधी 
पत्रकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीतून सतत मांडत आला असल्यानेच जनतेला विविध विभागातून न्याय मिळत आला आहे पत्रकार हा जनतेचा आरसा आहे अनंत अडचणीतून पत्रकार सद्यस्थितीत जात असताना समाजानेही त्यांच्या मागे उभे राहाणे ही आजची काळाची गरज आहे त्यांच्या लेखणीमुळेच समाज सुरक्षित असल्याचे प्रतिपादन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डाॅ. आण्णासाहेब बाचकर यांनी केले 

  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डाॅ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात दिशाशक्ती माध्यम समुहाच्या वतीने समाजातील विविध घटकातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना (उध्दव ठाकरे) चे जिल्हाध्यक्ष पैलवान रावसाहेब खेवरे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, रासप चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, दिशाशक्ती चे संपादक बाळकृष्ण कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, पुरस्काराचे आयोजक व उपसंपादक रमेश खेमनर, वावरथचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते 
   प्रसंगी समाजातील शैक्षणिक, वैद्यकीय, अध्यात्मिक, सामाजिक, खेळाडू, पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सन्मानचिन्ह, मेडल, सन्मानपत्र देत सन्मानित करण्यात आले 
 यात दैनिक प्रहारचे राहुरी तालुका प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानीत करण्यात आला 
  युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश भोसले प्रसंगी बोलताना म्हणाले समाजघटकातील गुणवंत व्यक्तिंचा शोध घेवून त्यांचा मानसन्मान करत त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत करण्याचा श्री रमेश खेमनर यांचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय असाच आहे त्यामुळे आणखी वेगवेगळे प्रयोग करत त्याचा समाजाला कसा फायदा होईल यासाठी हे पुरस्कारार्थी नक्कीच प्रयत्नशील राहतील यात शंका नाही परिवर्तशील प्रक्रियेचा हा भाग असून याचा निकोप लोकशाही वाढीसाठी फायदा असल्याचे त्यांनी सांगत असे कार्यक्रम सातत्याने होणे आवश्यक असल्याचे सांगितले 
        आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल ऑथेलिट प्रा. बागुल यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील महिला सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करतात परंतू त्यांना प्रसार माध्यमातून यथायोग्य प्रसिद्धी दिली जात नाही ही निश्चितच खंत त्यांनी बोलून दाखवत मात्र दिशाशक्ती माध्यम समुहाने ही दखल घेत माझा सन्मान केला ही माझ्यासाठी प्रेरणादायी घटना आहे 
  प्रसंगी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी पत्रकारांच्या अडीअडचणीत व त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यासोबत राहणार असून ग्रामीण भागातील पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने त्यांना मदत करण्यावर भर दिला प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर घाडगे, पत्रकार रमेश जाधव यांची समयोचित भाषणे झाली 
          प्रसंगी पुरस्कारार्थींच्या कुटूंबांसह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश खेमनर यांनी केले.

*पत्रकार कोंडीराम नेहे - लोहगाव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close