shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

काकर समाजाच्यावतीने सामुदायिक विवाह संपन्न..!


अजीजभाई शेख / राहाता 
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे (रविवार दि.२६ मे २०२४ रोजी) "रहबर-ए- कौम" या काकर समाजातील सेवा भावी संघटनेच्या वतीने काकर समाजाच्या ११ जोडप्यांच्या शुभ विवाह समारोह  आयोजित करण्यात आलेला होता.

इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या शिकवणी नुसार विवाह समारंभ हे अगदी साध्या व सोप्या पद्धतीने अत्यंत कमी खर्चात झाले पाहिजेत, मात्र आपल्या मुलींच्या विवाह निमित्ताने प्रत्येक समाजातील पालक हे कितीही गरीब असले तरी त्यांना वेळप्रसंगी कर्ज काढून आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावाच लागतो. याकरीता काळाची गरज ओळखून प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी प्रत्येक समाजातील गरीबांना आपल्या मुलींच्या पालन पोषण करता येईल व मुली ह्या आपल्या आई- वडिलांना ओझं किंवा पालन पोषणाकरीता अडचणीच्या ठरु नये म्हणून प्रेषितांनी सांगितले की, " जो कोणी एका मुलीचे चांगल्याप्रकारे पालनपोषण शिक्षण संस्कार करून मुलीचा विवाह करून देईल ते मातापित्यांच्या मरणोत्तर जन्नतुल फिरदौस (स्वर्गात) जागा माझ्या बरोबरच्या दर्जाने राहील व ज्यांना दोन तीन किंवा जास्त ही मुली असतील त्यांना जर आपल्या ऐपतीप्रमाणे पालनपोषण शिक्षण संस्कार करून मुलींचे विवाह लावून देतील तर नक्कीच त्यांना ही जन्नतुल फिरदौस स्वर्गात माझ्या बरोबरीनेच जागा निश्चितच असेल ' " ..
 प्रेषीतांची भविष्य वाणी हल्ली च्या अर्थात वर्तमान काळात किती योग्य ठरत आहेत. आज बहुतेक देशांमध्ये बहुतेक समाजामधे विवाहसाठी मुली भेटत नाहीत. त्यावर हल्लीच्या महागाईच्या युगात अशा भरपूर प्रमाणात समाजातील लोकांनी दोन वेळचे पोटभरून अन्न देखील  भेटेनासे झाले आहे,
नाजुक आर्थिक परिस्थितीमुळे काही लोकांना मुलींचे विवाह करणेकामी आर्थिक जमवाजमव करणे खुप अडचणीचे ठरत आहेत. मोठमोठ्या लोकांचे विवाह समारंभातील अवाढव्य खर्च आणी आयोजन बघून गोरगरिबांच्या मुलांच्या देखील अपेक्षा वाढलेल्या असल्याचे दिसून येतात. सदरील अशा नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरिबांच्या मुलींचे  शिक्षण आणी विवाह या बाबतीतील अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दृष्टीपथास येत आहे, प्रथमतः मुलीच्या वडीलांची परिस्थिती हलाकीची त्यावर कितीही  गरीबातील गरीब मुलगा का असेना त्यातील काहींना कॅश हुंडा, किंवा सोने (आंगठी/ लॉकेट) वाहने अशा बाबींची गोष्टींची मागणी करु लागले आहेत. ज्यांच्याकडे पैसा, धनसंपदा,संपत्ती,श्रीमंती असे सर्वकाही आहे,त्यांना खर्च कराण्यात काही अडचणी नाहीत, मात्र ज्या ज्याकडे काहीच नाही त्याने काय करावे? यामुळे गोरगरिबांच्या मुलींच्या विवाह प्रसंगी मोठ्या अडचणी ठरु लागल्या आहेत. याकरीता असे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पाहिजे ही हल्लीच्या युगात काळाची गरज आहे. करीता काकर समाजाने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करुन काकर समाजातील परिस्थितीने थोडेसे पुढे असलेल्या मानवतावादी विचारांवर आधारित लोकं व काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन बऱ्याच जागोजागी उदाहरण म्हणजे कोपरगांव तालुक्यात धोत्रे - भोजडे, तसेच वैजापूर आणी जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बरखेडी, लोहारी, कुर्‍हाड, तसेच बीड शहरात व सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याच्या बाभळेश्वर याठिकाणी " रहबर -ए- कौम " या सेवाभावी वृत्ती असलेल्या संस्थेच्या काकर समाजातील लोकांनी अभिमानास्पद असे सामुदायिक विवाहाचे आयोजन करून गोरगरिबांच्या मुलींच्या आकरा (११) विवाह उत्कृष्ट पध्दतीने लावून हजरत प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या शिकवणीचे महत्व वाढविण्याचे मोठे कार्य केले आहे.

या सोहळ्यात समाजातील हजारो लोकं यासोबतच विविध स्तरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवक डॉ. सलीम सिकंदर शेख - बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर, जालना जिल्ह्यातील इस्लामपुरचे सरपंच बाबाभाई काकर , वैजापूर येथील कय्युम सौदागर, वैजापूर येथील शमीमभाई सौदागर, अहमदनगर जिल्हा काकर समाज जिल्हाध्यक्ष इकबाल ईस्माईल काकर, वैजापूर येथील रउफभाई सौदागर , आझमभाई सौदागर,  महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतुन ,अहमदनगर, मुंबई ,जळगाव, ठाणे ,बीड , संभाजीनगर ,जालना जिल्ह्यातील काकर समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष अल्ताफ अयाज शेख तळेगाव, उपाध्यक्ष आरिफ शेख बाभळेश्वर, जावेद सलीम शेख तळेगाव, आलम काकर व रशीद काकर अकोले , मुश्ताक शेख संगमनेर, मुश्ताक शेख  समनापुर, हबीब काकर व शब्बीर काकर लोणी, अब्दुल शेख बाभळेश्वर, फिरोज काकर राहुरी फॅक्टरी, गणी शेख व रफीक शेख राहुरी फॅक्टरी,अफजल शेख नांदुर शिंगोटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सामुदायिक विवाह आजच्या युगात काळाची गरज असल्याचे बैतूश्शिफा हॉस्पिटल चे संचालक डॉ.सलिम सिकंदर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना यावेळी सांगितले.

*वृत्तविशेष सहयोग
इकबाल इस्माईल काकर (सर)
*मार्गदर्शक:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close