प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज येथील रामदास कुंभार यांची अखिल महाराष्ट्र कुंभार समाज प्रदेश अध्यक्ष पदी निवड झालेली असुन नुकतेच त्यांना कोअर कमिटी अध्यक्ष विश्वनाथ कोलमकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
गेल्या पंचविस वर्षांपासुन ते शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांनी योगदान दिले असुन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करतात.त्यांचे हे योगदान पाहुन प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे केज मध्ये अंकुश वाघमारे, अनंतराव राऊत,सरपंच चंनबस वायकर,अनिल खटावकर, गोपीनाथ निकर ,दिलीप गायकवाड,सुरेश राऊत यांनी त्यांचा विशेष सत्कार केला असुन या यशामुळे त्यांचे अभिनंदन केले आहे.