shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

देशाच्या केंद्र सरकारमधील तीसरे सत्ताकेंद्र झालेल्या चंद्राबाबू नायडूंना भारतीय जनसंसदच्या लोकभज्ञाक चळवळीचे कार्यकर्ते देशभरातून परवडणाऱ्या घरांसाठी लॅण्ड-पुलिंग आणि लॅण्ड-व्हॅल्यू कॅप्चर तंत्राचा वापर करण्यासाठी आग्रह धरणार-अशोक बब्बन..!

अहिल्यानगर:-
रविवार ता.१६ जुन २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नगरच्या जनरल पोस्टाच्या पेटीतून जाहिर निवेदन चंद्राबाबूंना भारतीय जनसंसदच्या लोकभज्ञाक चळवळीचे कार्यकर्ते पाठविणार आहेत.त्यामध्ये शेकडो घरकुल वंचित देखील सहभागी होणार आहेत.गेली दहा वर्षे मेरे देशमें मेरा अपना घर आंदोलनाने लॅण्ड-पुलिंग व लॅण्ड-व्हॅल्यू कॅप्चर योजनेचा केंद्र सरकारकडे आग्रह धरला होता, परंतु यासंदर्भात त्यावेळचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि भुतपूर्व गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांची दिल्लीला भेट घेऊनही, केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेंमध्ये या तंत्राचा समावेश केला नाही.ज्यांच्याकडे घरं घेण्यासाठी पैसा होता अशांना अनुदानाची खिरापत वाटून आकडे फुगविले.अहमदनगर शहरामध्ये वीस हजार घरकुल वंचितांची यादी करूनही त्यामध्ये एकालाही घर दिले नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकीत घरकुल वंचितांनी भाजपाचा डिच्च्यूफत्ते केला.

 चंद्राबाबू नायडूंनी यापुर्वी आंध्रची राजधानी बनविताना जगभरामध्ये प्रसिद्ध असलेले परवडणाऱ्या घरांसाठीचे लॅण्ड-पुलींग व लॅण्ड-व्ह्यॅल्यू कॅप्चर तंत्र वापरले.त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले आणि शेतकऱ्यांना अनेक पटीने जमिनीचा मोबदला मिळाला आणि राजधानी अमरावती उभी राहिली.
 चंद्राबाबू नायडूंचा इमारत बांधकाम क्षेत्रातील मोठा अनुभव देशातील घरकुल वंचितांना लाभदायक ठरणार आहे.गेली दहा वर्षे मोदी सरकारने फक्त घरकुल वंचितांना हाताएवढ्या चाव्या दाखवून स्वप्न रंगवली आणि मोठी फसवणूक केली.महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी लॅण्ड-व्ह्यॅल्यू कॅप्चर सारख्या उपयुक्त तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले आणि म्हाडाची डझनभर घरे वाटण्यासाठी वेळ खर्च केला.
भारतातील दारिद्र्य हटविण्याचे आणि झोपडपट्टी निर्मूलनाचे काम लॅण्ड-व्ह्यॅल्यू कॅप्चरद्वारे नक्की होऊ शकते,परंतू त्यासाठी कायदा करण्याची आणि सत्ता राबविण्याची इच्छा राज्यकर्त्यांमध्ये दिसून आली नाही.
देशातील आर्थिक व सामाजिक विषमता दुर करण्यासाठी आधुनिक कायदा आणि खऱ्या अर्थाने सत्ता राबविण्याची क्षमता आजपर्यंत राज्यकर्ते दाखवू शकले नाहीत.स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा आजच्या राज्यकर्त्यांपेक्षा इंग्रज चांगले होते,असे लोक बोलतात यातून स्वातंत्र्योत्तर काळातील देशाची सत्ता सत्तापेंढाऱ्यांनी भोगली, त्यातून स्वतःचा व कुटूंबांचा स्वार्थ साधला. त्यामुळे लोकभज्ञाक चळवळीने नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन केंद्रीतील सत्ताकेंद्रांचा आधार घेतला आहे.सत्तेवर आलेले लोक स्वतःला परमेश्वर समजू लागले, त्यामुळे राष्ट्रीय डिच्च्यूफत्ते जनतेने यशस्वी केला. लॅण्डव्ह्यॅल्यू कॅप्चर योजनेमुळे देशात दोन कोटी घरकुलवंचितांना परवडणारी घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.या योजनेमुळे केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरीक्त बोजा पडत नाही,असा दावा संघटनेने केला आहे.
चंद्राबाबू नायडूंनी देशभरातील घरकुलवंचितांच्या शुभेच्छा घेण्यासाठी सज्ज व्हावे असे कळकळीचे आवाहन लोकभज्ञाक संघटनेनचेॲड कारभारी गवळी यांनी केले आहे.

यावेळीही भारतीय जनसंसदच्या लोकभज्ञाक संघटनेचे ॲड.कारभारी गवळी,अशोक सब्बन,सुधिर भद्रे,कैलास पठारे, पोपटराव साठे,भा.को साळवे,अर्शद शेख,सखाराम सरक,ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरूडे, अशोक भोसले,विठ्ठल सुरम,वीर बहाद्दूर प्रजापती, अंबिका नागुल आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घरकुलवंचितांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
close