shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ज्येष्ठ नागरिक रेल्वे प्रवासभाडे सवलतीसाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी प्रयत्न करावेत - ज्येष्ठ पत्रकार बी. आर. चेडे

श्रीरामपूर / प्रतिनिधी 
भारतीय रेल्वे प्रशासनाकडून कोविडच्या अगोदर मार्च २०२० पासून वर्षानुवर्षे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी रेल्वे प्रवास भाड्यामधील सवलत बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक यांचेवर अन्याय होवून नाराजी पसरली आहे.

 बी आर चेडे

४ वर्षे उलटली तरी देशातून अनेक निवेदने दिली जात आहेत तरी अद्याप यावर निर्णय घेतला जात नाही. नुकतीच लोकसभा निवडणूक संपन्न झाल्याने नव्याने सरकार सत्तेवर आले आहे. 
पुर्वी ६० वर्षावरील पुरुष आणी ५८ वर्षावरील महिलांना रेल्वे प्रवास भाड्यात सवलत दिली जात असे. मात्र २०२० पासून सदरील सवलत बंद झाल्याने सलग चार वर्षापासून ज्येष्ठ नागरीकांना पूर्ण भाडे भरावे लागत आहे.ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ववत रेल्वे प्रवास भाड्यात सवलत देण्याची शिफारस पी. चिदंबरम यांनी केली होती. दि. २८ जुलै २०२३ च्या राज्यसभेतील प्रतिसादामध्ये असे नमूद आहे, सरकारने २०१९-२० मध्ये ५९८३७ कोटी रु. सबसिडी सवलत दिली आहे. ४ वर्षात रेल्वे सवलत बंद केल्यामुळे रेल्वेने ५८०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशी माहिती माहिती अधिकारातून (आर.टी.आय.) मुळे मिळाली आहे. यामुळे रेल्वेमंत्री यांचेकडे ज्येष्ठ नागरिक रेल्वे प्रवास भाडे सवलतीसाठी शिर्डी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच अहमदनगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सदरील रेल्वे प्रवास भाड्यातील सवलत मिळणेसाठी तात्काळ प्रयत्न करावेत. हा प्रश्न केवळ धोरणाचा नाही तर सामाजिक मुल्ये आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब देखील आहे. तेव्हा ज्येष्ठ वृद्धांची काळजी, सामाजिक समानता आणि प्रतिसादात्मक शासनाप्रती आपली बांधिलकी दाखविण्याची सरकारसाठी ही एक महत्वाची संधी आहे. असे मत शिरसगांव (ता.श्रीरामपूर) येथील ज्येष्ठ नागरिक तथा ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब आर.चेडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close