shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

खोकरला शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला शेळी जखमी,बोकड फस्त


 *बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा अंदोलन छेडणार - चक्रनारायण

श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवत बिबट्याने एक शेळी जखमी करून बोकड पळवून नेऊन फस्त केल्याची दुर्घटना घडली असून सुदैवाने शेळ्या पाळकाने पळ काढल्याने तो बचावला. या घटनेने परीसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण यांचेसह ग्रामस्थांनी दिला आहे.

खोकर शिवारात असलेल्या सिन्नरकर वस्तीकडे जाणार्‍या शिवार रस्त्याच्या कडेने खोकर येथील शेळीपाळक राजेंद्र अंबादास माकोडे हे नेहमीप्रमाणे शिवार रस्त्याच्या कडे आपल्या चाळीस शेळ्या व बकरं असा मोठा कळप चारत असताना खोकर - सिन्नरकर वस्ती लगत सिन्नरकर यांच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवत एका शेळीला जखमी केले तर या कळपातील बोकडावर हल्ला चढवत, बोकडाला घेवून ऊसात नेवून फस्त केले.

हा प्रकार लक्षात येताच शेळ्या पाळक राजेंद्र माकोडे यांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढला. या दरम्यान ते किरकोळ जखमी झाले परंतू सुदैवाने ते बचावले. हा प्रकार समजताच परीसरातील अशोकचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, सोसायटीचे माजी संचालक अंबादास सलालकर, माजी उपसरपंच हुसैन सय्यद आदिंसह अनेकांनी माकोडे यांची भेट घेवून सांत्वन केले. हा प्रकार समजताच वनपाल विठ्ठल सानप यांनी तातडीने घटनास्थळी समक्ष भेट देत माकोडे यांचे सांत्वन करत मार्गदर्शक सुचना केल्या त्याच बरोबर लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या परीसरात बिबट्याचा अनेक दिवसांपासूनचा मुक्काम असल्याने परीसरात मोठी दहशत निर्माण झालेली असल्याने वन विभागाने तातडीने या परीसरात पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे अन्यथा तीव्र अंदोलन छेडले जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण, अशोकचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, सरपंच आशाबाई चक्रनारायण, उपसरपंच दिपक काळे आदिंसह ग्रामस्थानी केली आहे.

वृत्त विशेष सहयोग 
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close