shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विशाळगड परिसरात तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी


सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिले निवेदन 

शेवगांव / प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गाजापुर गावात झालेला हल्ला आणि तोडफोड घटना मुस्लिम समाजाच्या भावना दुखवले आहे तसेच  समाजविघातक प्रवृत्ती समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल मुस्लिम समाज वतीने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.


 विशाल गडावरील अतिक्रमणचा मूळ विषय असताना समाजकंटकांनी गाजापुर या गावाला टार्गेट करत मुस्लिम समाजातील घराचे नुकसान करून तेथील नागरिकांना मारहाण केली आहे चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान केले. गाजापुर गावाला व परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घरांना लक्ष करणे व त्यांच्या घराची तोडफोड करणे त्यांची आर्थिक नुकसान करणे या घटनेमुळे महाराष्ट्राला कलंक लागले आहे या घटनेतील समाजकंटकावर आणि या घटनेचा मास्टरमाईंड शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ही घटना दुर्दैवी असून जे दोषी असेल कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिले यावेळी सकाल मुस्लिम समाज व बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड सुभाष लांडे, समाजसेविका विद्याताई गाडेकर, संजय नांगरे यांनी मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत  पाठिंबा दिला.
यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close