श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक कारखाना सलंग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभागाची वैष्णवी कांडेकर हिने ९० टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला, अशी माहिती प्राचार्य अंजाबापू शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. त्यामध्ये कॉम्पुटर इंजिनिअरिंग शाखेत प्रथम वर्षात सिद्धी तऱ्हाळ ७८.८२, द्वितीय वर्षात साधना जाधव ९०.६७, तृतीय वर्षात वैष्णवी कांडेकर ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागात प्रथम वर्षात विशाल राजवळ ७२.१२, द्वितीय वर्षात संकेत वमने ७९.४४, तृतीय वर्षात वरुण कहांडळ ८२.८० तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्रथम वर्षात रुद्रा कोकणे ६६.४४, द्वितीय वर्षात आरती फोपसे ७७.१३, तृतीय वर्षात कृष्णा बुऱ्हाडे ८३.८४ व मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रथम वर्षात सौरभ मुसमाडे ६१.१०, द्वितीय वर्षात मोहित गायकवाड ७३, तृतीय वर्षात निलेश वने ८२.८८ तसेच केमिकल इंजिनिअरिंग विभागात प्रथम वर्षात सौरभ काळे ६१, द्वितीय वर्षात प्रतीक्षा विटनोर ७१.१३, तृतीय वर्षात अभिषेक वाघ ८१.२२ यांनी उत्कृष्ट गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविले.
महाविद्यालयात उत्कृष्ट निकाल, १०० टक्के नोकरीची हमी, तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांमार्फत चांगले व उत्तम दर्जाचे शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, स्कूल बसेस, वसतिगृह खानावळ, फी मध्ये विशेष सवलत, शासनाचे विविध योजना व शिष्यवृत्तीचे लाभ, कॉम्प्युटरचे ज्ञान इत्यादी सोयी सुविधांमुळे चालू शैक्षणिक वर्षात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल अशोक पॉलिटेक्निककडे वाढत चाललेला आहे, अशी माहिती अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ, अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सदस्य विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, सौ.शितलताई गवारे, कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच कारखान्यातील संचालक मंडळ, अधिकारी, पदाधिकारी व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी कौतुक करीत अभिनंदन केले.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111