shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात अभ्यासक्रमात कथानिवडीबद्दल डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सन्मान

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यातर्फे विरुंगळा केंद्रात डॉ. बाबुराव उपाध्ये यांची '-- आणि कमल सापडली' ही कथा पुणे विद्यापीठ अंतर्गत निवडीबद्दल अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांच्या हस्ते गौरवचिन्ह,      स्नेहवस्त्र,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
    श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सन्मान करताना ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम म्हणाले, डॉ.उपाध्ये यांनी श्रीरामपूरच्या साहित्यिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला असून त्यांची ५१ पुस्तके प्रकाशित आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा सार्थ गौरव आहे. 


यावेळी दिनकरराव पोखरकर, सौ. पुष्पाताई पोखरकर, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी गटशिक्षणाधिकारी के.पी.बोरुडे,डॉ. वसंत जमधडे, प्राचार्य शंकरराव अनारसे, दामोदर जानराव, प्रभाकर भोंगळे आदी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांनी डॉ. उपाध्ये यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांतर्फे झालेला हा सन्मान गुरुपौर्णिमेनिमित्त मिळालेला आशीर्वाद आहे.' भावलेल्या कथा' ह्या अभ्यासक्रम कथा पुस्तकात ही कथा आहे. पुणे येथील डॉ.स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यात चिं.वि.जोशी, शांता शेळके आदिंच्या कथा समाविष्ट असून प्रथम वर्ष कला मराठी अभ्यासक्रमात ह्या कथेची निवड झाली आहे. यावेळी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी आपले' शब्दवैभव' हे पुस्तक सर्व उपस्थितांना भेट दिले तर डॉ. उपाध्ये यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांना आपली पुस्तके भेट दिली. वाचन संस्कृती वाढली तरच आपले ज्ञानभांडार संपन्न होईल. पुस्तके मस्तके घडवितात आणि आईच्या मायेने संस्कार करतात, त्यामुळे ज्याच्या हाती, माथी,घरी पुस्तके तेच खरे माणसांचे घर होय असे सांगून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मेळाव्यातर्फे अनेक उपक्रम संपन्न झाले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close