shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या कारवाईच्या आश्वासनामुळे तात्पुरत्या स्वरूपात उपोषण स्थगित.., पोलिसांनी आश्वासन न पाळल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करणार मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरातील अवैध व्यावसायाविरुद्ध मनसेने येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण छेडले होते मात्र श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या सदरील अवैध व्यावसायांवर कारवाईच्या आश्वासनामुळे तात्पुर्त्या स्वरूपात उपोषण स्थगित करण्यात आले असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मात्र पोलिसांनी दिलेले आश्वासन न पाळल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाची आंदोलन  करणार असेही मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी म्हटले आहे.श्रीरामपुर शहरातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण चालू करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व उप पोलिस निरीक्षक सोळुंके यांनी उपोषणा स्थळी भेट देऊन उपोषण करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे व मनसे पदाधिकारी यांना सांगितले की तुमच्या उपोषणाची दखल घेऊन श्रीरामपूर शहरातील अनेक ठिकाणी मटका व इतर जुगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे, यापुढेही कारवाई चालू राहील, तुम्ही उपोषण सोडावे अशी विनंती केल्याने उपोषणकर्ते मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहर अध्यक्ष सतीश कुदळे, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अमोल साबणे, रोजगार सेना तालुकाध्यक्ष नितीन जाधव,यांनी आपले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे.

याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना सांगितले की, यापुढे पुन्हा आम्हास श्रीरामपूर शहरात अवैधरीतीने जुगार तथा अवैध व्यावसाय चालू दिसल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध स्वरूपाचे तीव्र आंदोलन केले जाईल यापासून उद्भवलेल्या बऱ्या व वाईट परिणामास मग संबंधित पोलीस प्रशासनच जबाबदार राहील करीता वेळीच याची आपण नोंद घ्यावी असेही सांगितले असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
close