शौकतभाई शेख / श्रीरामपूर
सध्याच्या कलियुगामध्ये मुला - मुलींचे विवाह करणे ही एक मोठी समस्या झाली असून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामपूर येथील ' साई तारा ' मराठा वधू - वर ग्रुपतर्फे रविवार दि . २१ जुलै २०२४ रोजी ' मुला - मुलींचे लग्न ' या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र व फक्त मराठा समाजातील मुला - मुलींचा वधू - वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साई तारा मराठा ग्रुपचे ॲडमिन निवृत्त प्राध्यापक, पत्रकार रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सांगितली.
श्रीरामपूर येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ . ०० वाजता हे चर्चा सत्र आणी वधू - वर मेळावा आयोजित करण्यात आला असून या चर्चा सत्राची व वधू - वर मेळाव्याची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
या चर्चा सत्रात अ.नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . माहेश्वरी वीरसिंग गावित , श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि साई तारा ग्रुपच्या ॲडमिन आणि माजी प्राचार्या रजनीताई रघुनाथ गोंदकर उपस्थित राहून वधू - वर आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा.राऊत यांनी सांगितले.
आज मुला - मुलींचे लग्न जमविणे एक चिंतेचा विषय झाला आहे. अनुरूप जावई आणि अनुरूप सून मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. अशा या मूलभूत प्रश्नावर सामूदायिक चर्चा घडावी व वधू - वरांसह त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने या चर्चा सत्राचे व वधू - वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हे चर्चासत्र व वधू - वर मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन श्रीमती मीनाताई जगताप , सौ . रामेश्वरी लाटे , श्री . संतोष जगताप पाटील, प्राचार्या रजनीताई गोंदकर व प्रा . रामचंद्र राऊत आणी त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत .
या चर्चासत्रास व मेळाव्यास मराठा समाजतील वधू - वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . अधिक माहिती साठी ९२२५ ३१४ ७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर