shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री श्री रविशंकर शाळेच्या वतीने शासकिय ग्रामीण उप रुग्णालयात डॉक्टर्स डे साजरा..!


श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील शासकीय ग्रामीण उप रुग्णालय या ठिकाणी वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेच्या वतीने नॅशनल डॉक्टर्स दिना निमित्त शाळेच्या इयत्ता ४ थी ते ८ वी असे १०० विद्यार्थी यासोबत सर्व शिक्षक वृंद यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स आणी सर्व आरोग्य सेवक कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी विद्यार्थ्यांना रुग्णालयाचे सर्व विभाग दाखवण्यात आले तथा त्यांची माहिती देण्यात आली. 
शालेय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान विकसित व्हावे तसेच विविध सण उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती या गोष्टीचा अभ्यास व्हावा यासाठी श्री श्री रविशंकर शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वेळोवेळी नेहमीच मार्गदर्शन करण्यात येते, या स्तूत्य उपक्रमाबाबत शासकीय रुग्णालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close