रासपाच्या इंदापूर तालुका पूर्व अध्यक्षपदी नवनाथ कोळेकर, अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष अविनाश मोहिते, उपतालुकाध्यक्षपदी राहुल लोखंडे तर तालुका कार्याध्यक्षपदी गणेश हेगडकर यांची निवड.
रासपाच्या इंदापूर तालुका कार्यकर्ता मेळाव्यास महादेव जानकर यांची उपस्थिती राहणार - तानाजी शिंगाडे यांची माहिती.
इंदापूर: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर तालुका विधानसभा निरीक्षक तानाजी शिंगाडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख , पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोपने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये नवनिर्वाचित रासपाच्या इंदापूर तालुका पूर्व अध्यक्षपदी नवनाथ कोळेकर यांची एक मताने निवड करण्यात आली व अनुसूचित जमातीच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष अविनाश मोहिते व उपतालुकाध्यक्षपदी राहुल लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तालुका कार्याध्यक्षपदी गणेश हेगडकर यांची निवड करण्यात आली .
यावेळी तालुकाध्यक्ष तानाजी मारकड. तात्याराम मारकड, श्रीनिवास सातपुते. अण्णा पाटील . उप तालुकाध्यक्ष लक्ष्मण तरंगे, काळे सर, सोन्या जानकर, सुनील हेगडकर आदी उपस्थित होते.
यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून तानाजी शिंगाडे यांनी आणि किरण गोफने यांनी तालुक्याचे बुथ बांधणी याच्याविषयी आढावा घेतला व घोंगडी बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागू असा शब्द दिला व एक मताने निर्णय झाला. घोंगडी बैठकीनंतर इंदापूर तालुका कार्यकर्ता मेळावा होणार असून त्या मेळाव्याला स्वतःचं पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत.
इंदापूर मध्ये विधानसभेसाठी थेट पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या संपर्कात दोन उमेदवार आहेत. ते त्यांच्या पूर्ण संपर्कात आहेत. इंदापूरची जागा ही राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार व निवडून येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची माहिती तानाजी शिंगाडे यांनी दिली.