*लोकसेवा विकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी माजी आ.मुरकुटे यांचे आवाहन
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नुकतीच १ जुलै पासून राबविण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यामध्ये महिलांना बँक खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन १५ जुलै अखेर नावनोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथील उत्सव मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री.मुरकुटे बोलत होते. व्यासपीठावर लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, शहर अध्यक्ष नाना पाटील, सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी, व्हा.चेअरमन भाऊसाहेब हळनोर, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, पुंजाहरी शिंदे, डॉ.सुनिताताई गायकवाड, काशिनाथ गोराणे, सौ.शितलताई गवारे, सौ.शालिनीताई कोलते, डॉ.गोरख बारहाते, रमेश वारुळे, दत्तात्रय आढाव, रणछोडदास जाधव, गणेश छल्लारे, गणेश भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.मुरकुटे पुढे म्हणाले की, शासनाकडून वेळोवेळी विविध योजना राबविण्यात येत असतात. तसेच महिलांना या योजनेविषयीची सखोल माहिती, संगणकीय ज्ञान, कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. प्राथमिक स्वरूपात उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखल्याची पूर्तता तलाठी व तहसील कार्यालयातून करुन घ्यावी असे ते म्हणाले.
यावेळी जिद्द सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.मंजुश्रीताई मुरकुटे म्हणाल्या की, लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील महिलांना स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. तसेच शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे माहिती पत्रक महिलांपर्यंत पोहोचविले जाणार असल्याचे सौ.मुरकुटे म्हणाल्या.
पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.सौ.सुनिताताई गायकवाड यांनी योजनेची सविस्तर माहिती देतांना सांगितले की, २१ ते ६० या वयोगटातील विवाहीत, परितक्त्या, विधवा, घटस्फोटीत असलेल्या, वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखाचे आत असलेल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये आधार संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती दिली.
अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी म्हणाले की, संजय गांधी निराधार योजना, बांधकाम कामगार योजना, ई-श्रम कार्ड योजना आदी शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य श्री.मुरकुटे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे ही योजना देखील सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी ‘अशोक’ चे माजी संचालक काशिनाथ गोराणे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, भोकर सोसायटीचे चेअरमन गणेश छल्लारे, रमेश वारुळे, रणछोडदास जाधव, दत्तात्रय आढाव आदींनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यास ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, यशवंत रणनवरे, बाबासाहेब आदिक, रामभाऊ कसार, विरेश गलांडे, ज्ञानदेव पटारे, आदिनाथ झुराळे, भाऊसाहेब कहांडळ, दशरथ पिसे, मयुर पटारे, किशोर बनसोडे, सोपानराव नाईक, ॲड्.डी.आर.पटारे, अच्युतराव बडाख, दत्तात्रय नाईक, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, सुनिल बोडखे, सुभाष पटारे, नानासाहेब गांगड, रामदास पटारे, भाऊसाहेब पटारे, वसंतराव टेकाळे, कृष्णराव बडाख, अमोल कोलते, दिपक झुराळे, तुकाराम काजळे, प्रविण फरगडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
*पत्रकार अफजल मेमन श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ,
*संकलन* समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर - 9561174111