shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

करमाळा तालुक्यातून देशमुख चेस क्लासची विजयी घोडदौड...


नरेंद्रजी फिरोदिया चषक
शास्त्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा-2024

करमाळा / प्रतिनिधी

 अहमदनगर येथे शुक्रवार 19 जुलै ते रविवार 21 जुलै 2024 रोजी पार पडली .करमाळा तालुक्यातून प्रथमच ऑल इंडिया फिडे रेटिंग 1600 स्पर्धेत वयोगट 11 मधील खेळाडूंनी सहभाग घेऊन रेटिंग स्पेर्धेत उत्तम कामगिरी करत वयोगट 11 मधील खेळाडू अंश दुर्गेश राठोड याने पहिल्या फेरी मध्ये मुंबई चेसक्लब चा खेळाडूबरोबर ड्रॉ करण्यात यश मिळवले, 
करमाळा तालुक्यातून ऑल इंडिया रेटिंग स्पर्धेत मुलीमध्ये वयोगट 11 मधील प्रथमच भाग घेणारी प्रथम खेळाडू सिद्धी देशमुखने 9 राऊंड मध्ये 4 विजय मिळवत व तीन ऑल इंडिया रेटिंग खेळाडू बरोबर उत्तम कामगिरी केली, 
करमाळा तालुक्यातून ऑल इंडिया रेटिंग स्पर्धेत,वयोगट 10 मध्ये देवराज सतीश कन्हेरे 9 मध्ये 4 विजय मिळवत व ऑल इंडिया रेटिंग खेळाडू गुजरात व तामिळनाडू येथील खेळाडू बरोबर उत्तम कामगिरी केली, वयोगट 10 मध्ये आदित्य अजित सोनी 9 राऊंड मध्ये 2 ड्रॉ व 1 विजय मिळवत व ऑल इंडिया रेटिंग खेळाडू बरोबर उत्तम कामगिरी केली,वयोगट 14 मध्ये शंभूराज कन्हेरे 9 राऊंड मध्ये 2 ड्रॉ व 2 विजय मिळवत ऑल इंडिया रेटिंग खेळाडू बरोबर उत्तम कामगिरी केली .


अहमदनगर नगर बुद्धिबळ संघटनाचे सचिव यशवंत बापट सर करमाळा चेस असोसिएशनचे प्रा. नागेश माने सर,सचिन साखरे,मुकुंद साळुंके सर,शंभू मेरूकर,सचिन दळवे सर,विजय दाळवाले,अमोल राठोड यांनी व शहरातील मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात आल्या,करमाळा तालुक्यातुन ग्रँडमास्टर खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेऊन पृथ्वीराज देशमुख बुद्धिबळ या खेळातील मार्गदर्शन सर्व खेळाडूंना मोलाचे ठरत आहे .
close