shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निपाणी वडगांव वि. का. सोसा. चेअरमन पदी संजय गायधने तर व्हा. चेअरमन पदी रावसाहेब राऊत यांची बिनविरोध निवड


 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव येथील विविध कार्यकारी सोसायटी  लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली व अशोक सह. कारखान्याचे माजी चेअरमन व संचालक सोपानराव राऊत यांचे नेतृत्वाखाली पूर्व भागातील अग्रगण्य सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी संजय गायधने पाटील तर व्हा.चेअरमन पदी  रावसाहेब राऊत यांची एकमताने बिनविरोध निवड  झाली आहे, यावेळी निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्री.जोशी यांचे अध्यक्षते खाली पार पडली.

सदर प्रसंगी सोपानराव राऊत, माजी सभापती पंचायत समिती श्रीरामपुर प्रा.डॉ. सुनिताताई गायकवाड, माजी सरपंच रवींद्र पवार, बी.जी. गायधने सर, दीपकअण्णा राऊत यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


यावेळी सगानाना राऊत, विश्वासराव भोसले, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष बाजीराव राऊत,कारभारी शिंदे, एकनाथ राऊत, अशोक कारखाना पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दौंड, दत्तात्रय गोराणे,सरपंच सौ. सविता देवकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश देवकर, माजी चेअरमन हौशिराम देवकर, यशवंत गायधने, आबासाहेब राऊत,आशिष दौंड, विजय राऊत, किरण गायधने, रवींद्र गायधने, जगन्नाथ जाधव, भानुदास साळवे, संदिप गोराणे, भैय्या शेख, अर्जुन काळे, आबा काळे, निलेश कुंदे, दीपक राऊत, शिवाजी गायधने, सिद्धार्थ गायधने, राहुल देवकर, कैलास नाईक, बापुसाहेब पवार, आबासाहेब गायधने, रामचंद्र गायधने, चैतन्य गायधने, ऋषिकेश गायधने तसेच सोसायटी संचालक दत्तात्रय गोराणे, संतोष राऊत  ज्ञानेश्वर पडोळे शरद देवकर, ज्ञानेश्वर खाडे, दिलीप राऊत, राजेंद्र काळे, चांगदेव देसाई शांतवन जाधव, सौ. पुष्पा गायधने, सौ. ताराबाई पवार, संस्थेचे सचिव संजय नागुडे, गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आभार संस्थेचे मावळते चेअरमन राजेंद्र काळे यांनी मानले.

*पत्रकार राजेंद्र देसाई- वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close