नगर प्रतिनिधी : (तुषार महाजन)
महाराष्ट्र कामगार कल्याण, चंद्रपूर आयोजित समरगीत / स्पूर्तिगीत स्पर्धा २०२४ येथे नाट्यप्रतीक आणि स्वरगंध संघाने पटकाविला प्रथम क्रमांक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चंद्रपूर यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा समरगीत स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २५ जुलै रोजी बंगाली कॅम्प, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चंद्रपूर येथे करण्यात आले असून एकूण १० संघांनी यात आपला सहभाग नोंदवला.
वार्धेतिल नाट्यप्रतीक आणि स्वरगंध या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून चंद्रपूर गटाचे नेतृत्व्य करण्याचा मान या वर्धेच्या चमू ने मिळवला. स्पर्धेत अजय हेडाऊ सर (जेष्ठ संगीतकार) यांनी संगीतबद्ध केलेल्या स्पूर्तीगीताचे सादरीकरण करण्यात आले.
अपूर्वा तडस, नंदिनी गोडे, साक्षी बोंद्रे, सुविधा झोटींग, पूनम बोबडे, आर्ष चावरे, संतोष तायडे, प्रतिक सूर्यवंशी, रुपेश संत यांनी सहकार्य केले.
तबला वादक - गजानन काळे,
हार्मोनियम वादक- प्रवीण काळे,
मंजिरी - मयूर काळे
यांनी सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मां. अजय हेडाऊ सर ज्येष्ठ संगीतकार, सौ. खुशबू काठाने मॅडम,(संचालिका स्वरगंध म्युझिक क्लास), श्री प्रतिक सूर्यवंशी सर (संचालक नाट्याप्रतीक थिएटर अकॅडमी, वर्धा), सौ. सुषमा ढाले( कामगार केंद्र प्रमुख वर्धा), हंसराज ढाले ( गायक ) याचे आभार संपूर्ण चमूने साधले.
सोलापूरला होणाऱ्या अंतिम फेरी करीता चमू ०९ ऑगस्ट २०२४ ला रवाना होईल अशी माहिती नाट्यप्रतिक थिएटर ॲकॅडमी चे चालक प्रतिक सूर्यवंशी यांनी दिली.