shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डॉक्टर सुहास बर्दापूरकर यांचा केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते सन्मान


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरात बारा वर्षे सातत्याने मोफत तपासणी व रुग्णसेवा करणारे प्रसिद्ध ॲलर्जी व छातीचे रोग तज्ञ डॉ.सुहास बर्दापूरकर यांचा वैद्यकीय सेवेतील समर्पित सेवेबद्दल दिल्ली येथे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

          संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेले डॉक्टर सुहास बर्दापूरकर देशातील सर्वोत्तम डॉक्टरपैकी एक असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील विविध भागात जावून त्यांनी मोफत शिबिरे व गंभीर रुग्णांवर उपचार केलेले आहे.तसेच दमा, ॲलर्जी, छातीचे विकार यावर प्रशिक्षणे घेवून रुग्णांमध्ये आजाराविषयी जनजागृती करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
देश विदेशात आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान घेवून सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ते आजपर्यंत प्रयत्न करत आहेत.विविध वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक संस्थांवर डॉ सुहास बर्दापूरकर सेवाभावी वृत्तीने सेवाकार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून मान्यवर,संस्था आदींनी त्यांना विविध सन्मान,गौरव, पुरस्काराने सन्मानित केले आहे. जागतिक लिमका बुक मध्ये त्यांच्या वैद्यकीय कार्याची नोंद झालेली आहे.
          डॉक्टर सुहास बर्दापूरकर यांचे सन्मानाचे श्रीरामपूर मध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार अमोल शिरसाठ 
संकलन: 
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close