श्रीरामपूर / प्रतिनिधी:
इपीएस ९५ पेन्शनरांची गेली ७/८ वर्षापासून आंदोलने चालू असून केंद्र सरकारने वेळीच दखल घेतली नाही. आज केंद्रीय बजेट लोकसभेत सादर झाले.परंतु त्यात देखील आशेचा किरण दिसला नाही.आणि म्हणून आज इपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या झूम मिटिंगमध्ये दि ३१ जुलै रोजी नवी दिल्ली येथे जंतर मंतरवर ध्यानाकर्षण आंदोलन करण्याचे ठरले आहे.केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे.केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास ते आंदोलन पुढे सुरु ठेवण्यात येईल.त्यासाठी २९ व ३० जुलै रोजी दिल्लीत कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे.व या पुढे आंदोलनाची दिशा ही ठरविली जाईल, येत्या काळात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यात तसेच इतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती सरकारच्या धोरणाच्या विरोधात निर्णय घेण्याची शक्यता आहे म्हणून या आंदोलनाला महत्व प्राप्त होणार आहे.
दिल्लीच्या या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने पेन्शनधारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111