श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहरातील सेंट झेवियर्स शाळेमध्ये प्राचार्य फा.विक्रम शिणगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वारकऱ्यांना घेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले तर टाळ मृदुंगाच्या गजरात रिंगण करून बाल वारकरी दिंडीत मोठ्या उत्साहाने दंग झाले, विठ्ठल नामाच्या जयघोषात शाळेचा परिसर दुमदुमला गेला होता जणू काही झेवियर्स मध्ये विठ्ठल नामाची शाळाच भरली होती.दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
रवी त्रिभुवन सर, श्रीरामपूर
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११