श्रीरामपुर / प्रतिनिधी:
आपल्या विविध मागण्या संदर्भात महसुल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले असुन या आंदोलनामुळे महसुलचे कामकाज ठप्प झाले आहे त्याचा त्रास सर्व सामान्याना होत आहे.
महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसुल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समीतीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात लागु न करता करावा. अव्वल कारकुन, मंडलअधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देवुन आदेश निर्गमीत करावेत. महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजुर करुन पुरवठा विभागाच्या पद भरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल सेवेत सामावुन घ्यावे. वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा. महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक ३/२/२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकुन यांचे वेतन निश्चित करण्यात यावे. महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरुन २४०० करण्यात यावा. महसुल सहाय्यकाची सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी आदिसह अनेक मागण्या करीता हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. पहील्या दिवशी काळ्या फिती लावुन कामकाज करण्यात आले त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने नंतर लेखणी बंद आंदोलन व आता काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, सरचिटणीस किशोर हटकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवारे, संघटक चंदु प्रधान, समन्वयक राजु धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केलेले आहे.
या आंदोलनात ऐ.एस. ऐडके, एन.ई. मंडलीक, ऐ. आर. पुंड, एस. एस. गायकवाड, एस .आर. खाडे, एस .डी. आल्हाट, राजु निकाळे, आर. डी. शेले, ऐ. डी. रणनवरे, एस. एस. देसाई,डी. एस. आमले,ऐ. एस. राजवाळ, एम. जी. नाईक, मिलींद नवगीरे, एस.वाय. चंदन,एम. एस.खरपुडे आदिसह महसुल कर्मचारी सहभागी झाले आहेत.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111