shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बालभारती विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करते - कृष्णकुमार पाटील

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पत्रकाराचाही सत्कार

जावेद शेख / राहुरी  
बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीतून मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत असते. बालभारतीची मराठी पुस्तके सर्व माध्यमातील शाळांना उपयोगी आहेत. त्यामुळे बालभारती आज घरोघर पोहोचली असल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने होते. यावेळी प्राचार्य अरुण तुपविहिरे, जितेंद्र मेटकर, बाबासाहेब पवार, बाळासाहेब खेत्री उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला,
यावेळी पाटील म्हणाले, शाळेचे विद्यार्थी भाग्यवान आहे की ते ज्यांनी शिक्षणाचा पाया घालून दिला. त्या सावित्रीबाई फुले विद्यालयात शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होत आहेत.
यावेळी संस्थेचे सचिव महानंद माने जितेंद्र मेटकर, पत्रकारांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार जावेद शेख,अशोक मंडलिक,राजेंद्र पवार, प्रसाद मैड, सचिन पवार , कृष्णा गायकवाड, देवराज मन्तोंडे, उदय धामने, रमेश जाधव,आकाश येवले इ उपस्थित होते व आभार प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी मानले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार जावेद शेख,राहुरी 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561274111
close