shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक कॉलेज ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक कारखाना संलग्न अशोक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डी फार्मसीचा निकाल पहिल्याच वर्षी १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य प्रसाद कोते यांनी दिली. 
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित परीक्षेत प्रथम क्रमांक सामिया कुरेशी ७५.९०%, द्वितीय क्रमांक रोहिणी गायकवाड ७१.६०% तर तृतीय क्रमांक श्रावणी सोनवणे ७१.१०% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.


            चालू वर्षापासून प्रथम वर्ष डी फार्मसी व बी फार्मसीला प्रवेश देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील व परिसरातील इच्छूक विद्यार्थ्यांनी घरापासून दूर न जाता जवळच अशोक फार्मसीमध्ये औषधनिर्माणशास्त्रचे शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी केले आहे.
             ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता बस सुविधा, स्वतंत्र वसतिगृह, कॅन्टीन, अनुभवी  व तज्ञ प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा व ग्रंथालय निसर्गरम्य वातावरण, संगणक कक्ष आदी सुविधा सुविधा महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच अल्पावधीतच करिअर करण्याची सुवर्णसंधी व औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
             सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सदस्य विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, सौ.शितलताई गवारे, कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच कारखाना संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद कोते, विभाग प्रमुख किरण थोरात व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, पालक आदींनी कौतुक केले.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - *9561174111
close