shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मेहकर मध्ये दै. वृत्तपत्र संघटना केंद्रीय कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न


वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही प्रत्येक संपादकांची नैतिक जबाबदारी - उद्धव फंगाळ

मेहकर / प्रतिनिधी:
वृत्तपत्रस्वातंत्र्याचे रक्षण करणे, पत्रकारांचे हितसंबंध जोपासणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे, त्याचबरोबर पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे त्यांच्या व्यावसायिक उत्पन्न वाढीसाच्या प्रश्नांत लक्ष घालून ते सोडविण्याचे प्रयत्न करणे इ. अनेकविध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन  करण्यात आलेल्या दैनिक वृत्तपत्र संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना राज्यभर कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करून वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी संपादकांनी पुढाकार घेणे ही प्रत्येक संपादकाची नैतिक जबाबदारी आहे असे आवाहन शासकीय विश्रामगृह डोणगांव रोड मेहकर येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संपादक उद्धव फंगाळ  यांनी केले. 

          या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संपादक तथा संघटनेचे अध्यक्ष देविदास खनपटे, संपादक सादिक कुरेशी, संपादक अन्सार भाई, संपादक अंकुश राठोड, संपादक निलेश काळे, इत्यादी संपादकासह  अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी संघटनेचे मेहकर येथे मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करणे, प्रत्येक वर्तमानपत्र अंक छपाईसाठी संघटनेचा छापखाना सुरू करणे, त्याचबरोबर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटनेची कार्यकारणी गठित करणे, यासह अनेक विषय यावेळी  चर्चेला घेण्यात आले, बैठकीत सर्व संपादकांनी आपापली मते व्यक्त केली.
        या महत्त्वपूर्ण बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संपादक कैलास राऊत यांनी केले.
यावेळी संघटनेची पुढील बैठक दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
close