.
संगमनेर ( प्रतिनिधी ):- तालुक्यातील सांगवी गावचे जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जिजाबा कातोरे ( वय 75 वर्ष ) यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. ते नाना या नावाने सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे ते प्रगतशील शेतकरी प्रशांत कातोरे, कोतुळ येथील डॉ. कपिल कातोरे, ऋषिकेश कातोरे यांचे वडील होते.
सांगवी येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.