shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

शांततेच्या मार्गाने सण - उत्सव 
साजरे करावे - पो. नि. देशमुख

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील शहर पोलीस ठाणे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना विविध प्रकारच्या सूचना देऊन शांततेच्या मार्गाने तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखून जयंती उत्सव साजरी करावे असे आवाहन केले. तसेच या कालावधीत पारंपारिक वाद्य याचा वापर करावा तसेच सर्व संघटना यांनी रितसर पोलीस स्टेशन यांच्याकडून परवानगी घेणे अनिवार्य असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमात व्यसन करून धुडगुस घालणाऱ्या कार्यकर्त्यांची गय करणार नसल्याबद्दल माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक श्री.आव्हाड यांनी शांततेच्या मार्गाने जयंती साजरी करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार, भागचंद नवगिरे, जिल्हाध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना बंडू शिंदे, सतीश सौदागर, आकाश आढागळे, दीपक भांड,प्रवीण वैरागर,लहू खंडागळे, विशाल शिरसाठ, आशिष मोरे,नाना बोरकर आदिंबरोबर मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close