shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हरिगांव मतमाउली यात्रा भाविकांसाठी आवश्यक सुविधा देणार - आ.कानडे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा मतमाउली भक्तिस्थान येथे १४ सप्टेंबर रोजी भव्य मतमाउली यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने यात्रेतील भाविकांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी मतमाउली यात्रापूर्व तिसऱ्या नोव्हेनाच्या शनिवारी हरिगांव चर्चला भेट देऊन भाविकांसमोर दिले.व भाविकांना शुभेच्छाही दिल्या.प्रमुख धर्मगुरू डॉमनिक व सहकारी धर्मगुरू,ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मतमाउलीची मिरवणूक निघाल्यावर चर्च कार्यालयात आ.कानडे यांच्या समोर फा.डॉमनिक व हरिगांव येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध समस्या मांडल्या.त्यावर आ.कानडे यांनी सांगितले की, चर्चगेट ते चर्चपर्यंतचा खराब रस्ता तातडीने सुरळीत केला जाईल. हरिगांव ते खैरी निमगांव रस्त्याची बिकट परिस्थिती झाली ते पण काम यात्रेपूर्वी करण्यात येणार आहे.जलजीवन योजनेतून परिसरात पिण्याचे पाण्याची टाकी उभारण्यात येईल. यात्रेवेळी फिरते शौचालये देण्यात येतील.भक्तनिवास आदी सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील.काही तांत्रिक अडचणी असल्यास माझ्या परीने त्या दूर केल्या जातील असेही आ.कानडे म्हणाले.

         यावेळी चर्चा करताना सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे,ज्यो दिवे,बी.जी. पारधे,सुभाष पंडित, डी. एस. गायकवाड आदी सहभागी झाले होते. यावेळी फा.संतान यांचा वाढदिवस असल्याने आ,लहू कानडे,सचिन गुजर ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close