महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्तांची उपस्थित ; पालखी सोहळ्याचे एकोणिसावे वर्ष
इंदापूर तालुका प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील रेडा गावामधून सालाबादप्रमाणे श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळा श्री क्षेत्र गुलाबनगर (रेडा) ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आषाढ शुद्ध गुरुवार (दि.११) जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता. पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भारतातील विविध राज्यातून श्री संत गुलाबबाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.अॅड.गोपाल उमक, अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र टाकरखेड (मोरे) ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती व श्री संत गुलाबबाबा यांचे वंशज तसेच प्राध्यापक नरेंद्र पलांदुरकर, अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा यांच्या हस्ते या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे .
या पालखी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकुमार अग्रवाल अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर, विश्वस्त समाधी मंदिर टाकरखेड मोरे, उद्योजक विश्वासराव पवार,गोपाल रोकडे (पुणे), रमेश हिरे,डॉ. शिवाजीराव पाटील सचिव श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर, पैलवान दामोदर वानखडे,(आमला,दर्यापूर ),गोपाल कोलते (मलकापूर) शाहीर मुरलीधर लोणाग्रे मुख्य प्रचारक श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम, उद्योजक कमलाकर बागुल (नंदुरबार), प्रकाश देशमुख मुख्य प्रवर्तक बँक ऑफ बडोदा मुंबई ,निशिकांत लाड,अशिष शिरगावकर,मनोहर म्हात्रे, भूषण शिंदे, भगवान म्हात्रे, संतोष राऊत (अलिबाग)प्रकाश मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
*पालखी मुक्कामाची ठिकाणी पुढीलप्रमाणे:-* ११ जुलै- मुक्काम मारुती मंदिर ,रेडा, १२ जुलै- सराटी, १३ जुलै- मायनर सेक्शन (महाळुंग) ,१४ जुलै- वाघजाई वस्ती (बंडीशेगांव), १५ जुलै- वाखरी,१६ जुलै ते १८ जुलै श्री संत गुलाबबाबा आश्रम पंढरपूर गोपाळपूर या ठिकाणी मुक्काम होणार असून गोपाल काळा झाल्यानंतर पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये ह. भ. प.चंद्रकांत महाराज धायगुडे (पारगावकर), बोधले महाराज (वडापुरी), नागरगोजे महाराज (आळंदी),संतोष महाराज कांबळे (राजवडी), अशोक महाराज मोहिते (रेडा), प्रसिद्ध लोकशाहीर मुरलीधर लोणाग्रे महाराज (तेल्हारा) मुख्य प्रचारक श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम, सोमनाथ महाराज पोळ कर्मयोग सहकारी साखर कारखाना बिजवडी, विश्वस्त सकल संत वारकरी संघ महाराष्ट्र राज्य, यांची कीर्तन सेवा होणार आहे.अशी माहिती श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रमुख ,संस्थांचे अध्यक्ष अॅड. तानाजीराव देवकर, सचिव तुकाराम जगदाळे यांनी दिली.
जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी मंडळींना गेली बारा वर्षे चहा- अल्पोहार
इंदापूर,माढा, करमाळा भागातील श्री संत गुलाबबाबा भक्त मंडळ यांच्या मार्फत दि.१० जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून इंदापूर बायपास नजीक, बारामती रोड , इंदापूर येथे जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी मंडळींना चाहा, नाष्टा, पिण्याच्या पाण्याची सोय करतात.या मंडळाचे बारा वर्षे आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच बाहेरील राज्यातून श्री संत गुलाबबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात सामील होतात व सेवा देतात.