shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नवज्योती महिला मंडळ आयोजित "सुगरण क्वीन" स्पर्धा उत्साहात संपन्न


प्रतिनिधी : शितल जैन

म्हसरुळ (नाशिक ) : ११ /  नवज्योती महिला मंडळ आयोजित "सुगरण क्वीन" स्पर्धा बुधवार दिनांक १० जुलै रोजी म्हसरूळ येथील अभिषेक प्लाझा सभागृहात अतिशय उत्साहात पार पडली.

 मंडळाच्या सभासद भगिनींनी  या स्पर्धेत भरभरून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यासाठी 
ओल्या नारळाचे  पदार्थ घरून बनवून आणायचे होते . तिखट आणि गोड  अशा दोन्ही चवीचे   छान आणि अतिशय सुंदर पदार्थ  स्पर्धकांनी बनवलेले होते . या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून  वृषाली घोलप आणि श्रुतिका बेळगांवकर यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले .

 विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :

प्रथम पारितोषिक:-
१) दीप्ती मेहता
२) कावेरी गंगवाल

द्वितीय पारितोषिक:-
१) दिपाली गवळी
२) सुनंदा चव्हाण

तृतीय पारितोषिक:-
१) वर्षा पाचपेंड
२) दिपाली दशपुत्रे

उत्तेजनार्थ पारितोषिक:-
१) सुजाता कुलकर्णी
२) सुवर्णा बाविस्कर

आयोजकां मार्फत सर्व विजेत्या स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. दवे यांचे दिव्य मसाले यांच्या तर्फे बक्षिसे देण्यात आली. उपस्थित असलेल्या  सभासदांनाही दवे यांचे दिव्य मसाले यांचे कडून गिफ्ट देण्यात आले . त्यांचे प्रतिनिधी मनोज येवले हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुखवास चे विविध प्रकार कसे  बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवून ते शिकवण्यासाठी सौ . सुचित्रा  तलाजिया यांना आमंत्रित करण्यात आले होते .

 अशा अनेक विविध उपक्रम राबविण्यात मंडळ नेहमीच अग्रेसर  असते असे मंडळाच्या अध्यक्षा सौ .अलका फळे यांनी  आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले .प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून सौ . नीलम पहाडे यांनी काम पाहिले . 

मंडळाच्या सचिव सौ . शितल जैन यांनी अतिशय सुंदररित्या आभार मानले. सर्व कमिटी  मेंबर्स यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे आणि सर्वांच्या परिश्रमाने कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला.
close