अक्षय तोटावार - पाटणबोरी / यवतमाळ दिनांक २७ जुलै रोजी श्री कालिका मंदिर सभागृहात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उभाठा) तर्फे मोफत आरोग्य रोग निदान, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत औषधी वाटप शिबिर करण्यात आले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एकूण २१४ रुग्णांनी लाभ घेतला .यातील चार मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाभार्थ्यांना पांढरकवडा येथे पाठविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. शरद चव्हाण, डॉ.रवींद्र चव्हाण, डॉ.सागर गाडगे, सलीम खान ,रामचंद्र आडते आदींनी सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोहर मसराम,आर्णी केळापूर विधानसभा अध्यक्ष शिवसेना (उभाठा), तिरुपती कंदकुरिवार तालुकाप्रमुख, जयंत कनाके उपतालुकाप्रमुख, प्रभाकर येरमे विभागप्रमुख ,सुहास वानखेडे , कृष्णाजी बुरेवार , सुरज मेश्राम, मनोज आडे, धनराज जुमनाके, प्रफुल्ल चांदेकर, गणेश मडावी, सुजल यरमे आदींनी परिश्रम घेतले.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111