श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट येथे स्वयंपाक गृह वास्तूचे उद्घाटन संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट येथील ४० लाख रुपये खर्चाच्या स्वयंपाकगृहाच्या इमारतीचे उद्घाटन आमदार लहु कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सराला बेटाच्या विकासासाठी आ. कानडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे त्याचे कौतुक केले.
आ. कानडे यांनी दिलेल्या निधीतून श्रीक्षेत्र सरांना बेट येथे ४० लाख रुपये खर्चाच्या स्वयंपाकगृहाचे वास्तू उभारण्यात आले असून या वास्तूचे उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आ. कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज, विश्वस्त मधु महाराज, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सरचिटणीस सतीश बोर्डे, संदीप जगताप, अक्षय वाणी, आप्पासाहेब दुशिंग आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, आमदार कानडे यांच्या रूपाने श्रीरामपूर तालुक्याला सुशिक्षित आणि काम करणारा आमदार मिळाला आहे, सरला बेटाकडे येणारे सर्व रस्ते त्यांनी आपल्या निधीतून डांबरीकरण करून भाविकांची दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, बेटाच्या विकासासाठी त्यांनी कोट्यावधी रुपये निधी दिला आहे, भाविकांना अन्नदान करण्यासाठी स्वयंपाक गृहाची आवश्यकता असून त्यासाठी निधी देण्याची विनंती आ. कानडे यांनी तातडीने मान्य करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे, त्यांच्या निधीमुळे सरला बेटाच्या विकासास मोठा हातभार लागला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आमदार कानडे म्हणाले की, तालुक्यातील जनतेने सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिले त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण जनतेची कामे केली आहेत, यापुढेही करत राहणार आहे. श्रीक्षेत्र गोदाधाम साराला बेट येथे राज्यभरातून भावीक येतात त्यांच्यासाठी चांगल्या स्वरूपात रस्ते नसल्याने आपण प्रारंभी रस्त्यांची कामे केली, या क्षेत्राच्या सर्व बाजूने येणारे रस्ते डांबरीकरण केले, काही रस्त्यांचा दर्जा उन्नत करून त्याला कायमस्वरूपी निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला. रामगिरी महाराज यांनी सुचविल्याप्रमाणे निधी दिला, यापुढेही बेटाच्या विकासासाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११