shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

साई तारा' तर्फे २१ जुलै २०२४ रोजीचर्चासत्र आणि वधू - वर मेळावा


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी रविवार दि .१४ जुलै २०२४ रोजी श्रीरामपूर बंदचे आयोजन करण्यात आल्यामुळे  ' साई तारा ' मराठा वधू - वर ग्रुपतर्फे रविवार दि .१४ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र आणि वधू - वर मेळावा आता रविवार दि . २१ जुलै २०२४ रोजी  घेण्यात येणार  असल्याची माहिती साई तारा मराठा ग्रुपचे ॲडमिन निवृत्त प्राध्यापक, पत्रकार रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सांगितली .

   श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात दि. २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ . ०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रासाठी ' मुला - मुलींचे लग्न ' हा विषय ठेवण्यात आला असून फक्त मराठा समाजातील वधू - वर यांच्यासाठी  आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राची व मेळाव्याची फी फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आली असल्याचेही प्रा. राऊत यांनी सांगितले .
   ' मुला - मुलींचे लग्न ' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या चर्चा सत्रात अ.नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माहेश्वरी वीरसिंग गावित , श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ . वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि साई तारा ग्रुपच्या ॲडमिन आणि माजी प्राचार्या रजनीताई रघुनाथ गोंदकर उपस्थित राहून वधू - वर आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
   आज मुला - मुलींचे लग्न जमविणे एक चिंतेचा विषय झाला आहे . अनुरूप जावई आणि अनुरूप सून मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते . अशा या मूलभूत प्रश्नावर सामूदायिक चर्चा घडावी व वधू - वरांसह त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने या चर्चा सत्राचे व वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
   हे चर्चासत्र व वधू - वर मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन श्रीमती मीनाताई जगताप , सौ . रामेश्वरी लाटे , श्री . संतोष जगताप पाटील  , प्राचार्या रजनीताई गोंदकर व  प्रा . रामचंद्र राऊत व त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत .
   या चर्चासत्रास व मेळाव्यास मराठा समाजतील वधू - वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . अधिक माहिती साठी ९२२५ ३१४ ७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर 

*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close