shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आषाढी एकादशीनिमित्त माऊली वृद्ध आश्रमात विविध कार्यक्रम संपन्न


विठुरायाच्या दर्शनाने मन प्रसन 
-पो.उ.नि.दादाभाई मगरे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 येथील नेवासा रोड रेल्वे ओव्हर ब्रिज परिसरातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी मान्यवरांच्या हस्ते विठूरायांचा जलाभिषेक होऊन  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांचे शुभ हस्ते  महाआरती तसेच विधिवत पूजन यासोबतच परीसरात वृक्षारोपन करण्यात आले.

 वृद्धाश्रमाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, यावेळी पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांनी विठुरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न होत असल्याचे प्रतिपादन केले. प्रसंगी अध्यक्ष सुभाष वाघुंडे सौ. कल्पना वाघुंडे, पोलिस हवालदार संतोष परदेशी,पो. ना. प्रशांत बारसे, संपत बढे, पत्रकार चंद्रकांत झुंरगे, राजेन्द्र देसाई,अमोल कदम, सलाउद्दीन शेख, गौरव शेटे, बाळासाहेब जपे, दिनेश जेजुरकर, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, संतोष भालेराव तसेच आश्रमीय आजी - आजोबा, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते.
 सकाळपासूनच भाविकांनी विठूरायांचे रांगे मधून दर्शन घेतले, आश्रमाच्या वतीने तसेच भाविकांमधुन केळी, खिचडी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close