अजीजभाई शेख / राहाता
अखिल भारतीय विद्यार्थी तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये कु.तनुजा शरद भालेराव हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
पंचायत समिती राहाता शिक्षण विभाग व राहाता तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, राजुरी (ता.राहाता) येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रवरानगर (ता.राहाता) येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.तनुजा शरद भालेराव हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातील वकृत्व स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे, जनरल बॉडी सदस्य बी.जी. आंधळे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, राहाता गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, उपप्राचार्य अलका आहेर, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ आदींसह सर्व शालेय समित्यांचे प्रमुख, सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. तिला शिक्षिका माधुरी वडघुले यांचे मार्गदर्शन लाभले.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट, प्रवरानगर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111