shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

रोजगार मेळाव्यातून बेरोजगार तरुणांना सुवर्णसंधी


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
शासनाच्या कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दिनांक १५ जुलै,  २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत अहमदनगर महाविद्यालय,स्टेशन रोड, अहमदनगर येथे तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  

इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

  या तालूकास्तरीय रोजगार मेळाव्यासाठी जिल्हयातील ३० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरींग, कृषी क्षेत्र, बँकिंग, आय टी, फुड प्रोसेसिंग, आरोग्य, हॉस्पीटॅलिटी, गारमेंट, शैक्षणीक, सेवा इ. क्षेत्रातील सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत.
  सर्व इच्छूक एसएससी, एचएचसी, पदवीधर (बीए,बीकॉम,बीएससी,कृषी,फार्मासिटीकल), आयटीआय (सर्व ट्रेड) व वैद्यकिय (नर्सिंग), (आयटी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कंप्युटर व इतर  क्षेत्रातील) डिप्लोम,डिग्री झालेल्या उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयाने विकसीत केलेल्या https://forms.gel/1YCTa3Avgg8kVVbz5 या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय करावे. दिनांक १५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत अहमदनगर    महाविद्यालय, स्टेशन रोड, अहमदनगर येथे रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा रोजगार मेळावा समन्वयक श्री. वसीमखान पठाण मो. नं. 9409555465, श्री. मच्छिंद्र उकिरडे, मो. नं. 9595722424, श्री. संतोष वाघ, मो. नं. 8830213976, श्री. बद्रिनाथ आव्हाड, मो. नं. 9420725280, श्री. योगेश झांजे, मो. नं. 9588408890 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. 
*वृत्त विशेष सहयोग

पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close