*वक्तृत्वच नेतृत्व निर्माण करते- फा. प्रकाश भालेराव
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहरातील सेंट झेवियर्स शाळेमध्ये येशू संघाचे संस्थापक संत इग्नाती लोयोलाकर यांच्या सणानिमित्त प्राचार्य फा. विक्रम शिणगारे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ व्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील २१ शाळांनी स्पर्धक म्हणून या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू व सेंट झेवियर्स शाळेचे व्यवस्थापक फा. प्रकाश भालेराव व प्रमुख पाहुण्या म्हणून महिला शिक्षक- पालक संघाच्या उपाध्यक्षा कावेरी मांडण या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना फा. भालेराव म्हणाले की, वक्तृत्वच माणसात नेतृत्व निर्माण करते आणि नेतृत्वच समाज घडवतो म्हणून विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण वाढीस लागावा या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवे. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळविणे काळाची गरज आहे त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला व विजेत्यांसह स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सहसचिव व संत तेरेसा बॉईज हायस्कूलचे पर्यवेक्षक फा. फ्रान्सिस ओहोळ, ज्ञानमाता कॉन्व्हेंट स्कूल संगमनेरचे मुख्याध्यापक फा. प्रशांत शाहराव व झेवियर्स टेक्निकल श्रीरामपूरचे डायरेक्टर फा.संपत भोसले यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सेंट झेवियर्स स्कूल श्रीरामपूर या शाळेने पटकाविला. द्वितीय क्रमांक सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर या शाळेने तर तृतीय क्रमांक आयकॉन पब्लिक स्कूल अहमदनगर यांनी मिळविला.
इंग्रजी माध्यम उत्तम वक्ता म्हणून सईश गलांडे (सेंट झेवियर्स स्कूल) व सिद्रा शेख (सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर) यांनी तर मराठी माध्यम उत्तम वक्ता म्हणून सम्यक गुगळे व सिद्धी शिंदे यांनी बक्षीस मिळविले.
उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे सेंट जॉन स्कूल राहाता, अशोक आयडियल स्कूल श्रीरामपूर, ऑक्स्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर, सेंट मेरी स्कूल नेवासा व सेंट विवेकानंद स्कूल अहमदनगर यांना प्राप्त झाली.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये ५०००/- सनी लोंगाणी यांनी दिले तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रुपये २०००/- आमित साळवे व तृतीय क्रमांकाचे बक्षीस रुपये १५००/- यश दिवे यांनी दिले.
विजेत्यांसाठी फिरते चषक व स्मृतिचिन्हे योसेफ कांबळे यांनी यांच्याकडून देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पटेकर यांनी केले तर सूत्रसंचालन पूर्वा कोठारी, वैष्णवी बोराडे व मेहक लोंगानी यांनी केले. कार्यक्रमादरम्यान महिमा भालेराव व सहकाऱ्यांनी सुमधुर गीत गायन केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य फा. विक्रम शिणगारे,आनंद पटेकर, समन्वयिका अनिता पाठक, मिलाग्रीन कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
रवि त्रिभुवन (सर) श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111