shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विशालगड घटनेच्या दोषींवर कारवाई करुन पिडीतांचे पुनर्वसन करण्याची एमआयएमची मागणी...!


अहमदनगर / प्रतिनिधी:
 कोल्हापूर जिल्ह्यात विशालगड येथे काही वर्षापासून अतिक्रमण हटवण्यासाठी काही संघटना आंदोलन करत आहे. संबंधित गडाला लगतच असलेली मलीक रेहान दर्गा ही खूप जुनी असून त्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत मिळत असल्याचे पुरावे आहेत. या दर्ग्याला सर्व जाती - धर्माचे लोक मानत असून सर्व जाती -  धर्माचे भाविक भक्त येथे नवस करून फेडण्यासाठी येत असतात, विशालगडाजवळ परिसरात अनेक वर्षापासून नागरीक राहत आहे. यापैकी काहींनी अतिक्रमण केली असले तरी काहींचे स्वत:चे घर आहेत. काही दिवसांपासून विशालगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी काही संघटना अग्रेसर असल्याने व संबंधित संघटना आंदोलन  करीत असल्याने संबंधित पंचायत , पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचे निर्णय घेतले असल्याचे समजते. तथा अतिक्रमण काढणे हे तसे पंचायत, पालिकेचे काम परंतु अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही जातीयवादी संघटनांनी जाणीवपूर्वक जातीय दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. 


या संघटनेने अतिक्रमणच्या नावाखाली गजापूर गाव आणी इतर परिसरात एका विशिष्ट समाजाचे धार्मिक स्थळ आणी धार्मिक ग्रंथाची विटंबना करत त्यांच्या घरादारासह दुकानांवर हल्ला करत महिला,वृद्ध बालकांना अमानूषपणे मारहाण देखील केली आहे.आणि हा धुडघूस घातला असताना त्याचे चित्रीकरण करुन व्हायरल देखील केले.याचा अर्थ असा की या समाजकंटकांना समाजात दुही निर्माण करुन जातियवादास फोफावयाचे आहे हेच यावरुन स्पष्ट दिसून येते. संबंधित संघटनने ज्याप्रकारे मुस्लीम समाज आणी त्यांचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिद व त्यातील पवित्र धार्मिक ग्रंथाची विटंबना केली. त्यावरून हे स्पष्ट आहे की या जातीवादी समाजकंटक तथाकथीत  संघटनेला सरकारचे परिपूर्ण पाठबळ असल्याचे देखील दिसून येत आहे.तसेच हा सर्व  हैदोस घडत असतांना तेथील पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांची जी बघ्याची भूमिका होती त्यावरून देखील हे स्पष्ट जाणवत आहे.त्यामुळे संबंधित महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत मुस्लीम समाजावर अत्याचार होत आहे हे दिसत असताना त्यांनी या समाजकंटकांना रोखण्यासाठी कोणतीच ठोस भूमिका त्यावेळी घेतली नाही. या उलट अतिरेक माजवणाऱ्या समाजकंटकांच्या सोबत पोलिस प्रशासन दिसून येत आहे. मग हा हल्ला शासन पुरस्कृत समजायचा का असा खडा सवाल आय ए.एम आय एम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ.परवेज आशरफी यांनी उपस्थित केला आहे.

तसेच सदरील प्रकरणी निपक्षपाती  सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हे सर्व घटनाक्रम पाहिले तर असे दिसते की मुस्लीम समाजावर अत्याचार करणे
त्यांचे धार्मिक स्थळांची विटंबना करणे, त्याचे धार्मिक ग्रंथाची विटंबना करणे, मुस्लीम समाजाचे महिला, लहान मुले यांना बेदम मारून अत्याचार करणे हे सर्व प्रकरण सरकार व  जिल्हा  पोलीस प्रशासन यांच्या मदतीने या समाजकंटकी संघटनेने केले असल्याचे आरोप देखील एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ. अशरफी यांनी केले आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात डॉ. परवेज अशरफी यांनी म्हटले आहे की, विशालगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या नावाखाली या जातीवादी समाजकंटक संघटनेने जमाव जमा करण्यासाठी आव्हान केले होते.
ज्या प्रकारे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली. त्याच प्रकारे कोल्हापूर येथे रजा जामा मस्जीद शहीद करून बाबरी मस्जिद ची पुर्नावृत्ती करण्याचे षडयंत्र या जातीवादी समाजकंटक संघटनेचे असल्याचे दिसत आहे. तरी संबंधित दोषीवर लवकरात लवकर योग्य आणी कठोर कारवाई करण्याची मागणी एम आय एम ने केली आहे. तसेच ज्या नागरिकांचे नुकसान झाले, ज्यांचे घर उध्वस्त झाले त्यांचे सरकारने पुनर्वसन करून त्यांना आधार देण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
close