shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लाचखोर मुख्यध्यापीकेद्वारे तक्रारदार कुटुंबीयांना त्रास होवू नये; त्रिदल चे जि.प.मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना निवेदन


श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
थकीत वेतनातील अपहार व वेतन देयकातील बेकायदेशीर कपात केल्याप्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.


सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रतिष्ठित असलेल्या शंकरराव गायकवाड एज्युकेशन सोसायटीचे सौ, सुभद्राबाई बाबुराव गायकवाड या शाळेत माजी सैनिक श्री,भगीरथ लक्ष्मण पवार यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती, शेळके सुनंदा बारकू या गेल्या अनेक वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून या शाळेत सेवेत आहेत त्यांची वरिष्ठ वेतन श्रेणी सन २०२२ ला मंजूर झाली मंजूर झालेली रक्कम त्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२३ ला जमा झाला त्याची एकूण फरकाची रक्कम २,०७,२३० रू (दोन लाख सात हजार दोनशे तीस रुपये) त्यांच्या एडीसीसी बँकेमध्ये पासबुकात शासनाच्या माध्यमातून जमा झाली परंतु शाळेच्या मुख्याध्यापिकेने व संस्थेच्या अध्यक्षांनी संगणमत करून त्याच दिवशी रक्कम ही दुसऱ्या शाळेची असून आपल्या खात्यावर चुकून जमा झाली आहे त्यामुळे ती रक्कम आपण काढू नये असे खातेदारास भ्रमणध्वनी वरून कळवले व पाच मिनिटाच्या फरकाने खातेदाराची कुठल्याही प्रकारची स्वाक्षरी अथवा विड्रॉल स्लिपवर स्वाक्षरी  न घेता व परवानगी न घेता शासनाच्या या आलेल्या रकमेतून १,०७,२३० (एक लाख सात हजार दोनशे तीस) रुपये परस्पर मुख्याध्यापीका श्रीमती , संगिता पवार यांच्या खात्यावर जमा करण्यात आले सदर याच बिलातच दुसऱ्याही शिक्षिकेचे परस्पर २५७७६ (पंचवीस हजार सातशे शेहात्तर ) रू,कपात करून अपहार झाल्याचे समजते, याप्रकरणी चौकशी अंति कळाले की आपल्याकडे शिक्षक सोसायटीचे कर्ज असुन कपात म्हणून ती रक्कम वर्ग करून घेतली आहे, परंतु शिक्षक सोसायटीमध्ये जाऊन चौकशी केली असता सोसायटीचे कुठल्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे निष्पन्न झाले व निरंक असल्याचा दाखला सोसायटीकडून घेण्यात आला, व मुख्यध्यापीके बरोबर चर्चा केली असता तुंम्हांला फरकाची एवढी मोठी रक्कम संस्थेने आणि माझ्याच प्रयत्नाने मिळालेली आहे त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा हप्ता १,६२,३६६ (एक लाख बासष्ट हजार तिनशे सहासष्ट) रूपये मार्च  २०२४ मध्ये मिळाल्यावर लगेचच व सातत्याने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता पवार यांनी आमच्या मुळे तुमचा एवढा मोठा फायदा झाला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ५०,००० (पन्नास हजार) रुपयाची रक्कम द्यावीच लागेल अशी लाचेची मागणी सातत्याने माजी सैनिकाकडे लावली होती शेवटी नाईलाजास्तव ४५०००, ( पंचेचाळीस हजार) रू.रक्कम लाच देण्याचे ठरल्यानंतर लाच लुचपत विभाग अहमदनगर यांचे कडे तक्रार केल्याने संबंधितावर लाच लुचपत खात्याने ४५०००, (पंचेचाळीस) हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे थकित देयकातून नियमाप्रमाणे परस्पर रक्कम कपात करता येत नसताना या रकमेचा मुख्याध्यापिकेने स्वतःसाठी अपहार केला असून माजी सैनिकाच्या परिवारास मानसिक व आर्थिक त्रास दिला असल्याने व अशाच प्रकारे शाळेमधील अनेक शिक्षकांना सातत्याने त्रास देणे , वेठीस धरणे, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणे , शिक्षकांना प्रत्येक महिन्याला शालेय कार्यक्रमासाठी जबरदस्तीने मासिक वर्गणीची मागणी करणे, पगार बिलासाठी पैसे घेणे अशा प्रकारचा अपहार या शाळेमध्ये अनेक वर्षांपासुन वारंवार होत आहे, तसेच लाच न देणाऱ्या शिक्षकांवर खोटे आरोप करून त्यांना वेठीस धरून नोकरीवरून काढून टाकण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेवर श्रीरामपूर न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये केसेस सुरू आहे, तिथेही सर्रासपणे खोटे नाटे बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण विभाग व न्यायालयाची सातत्याने दिशाभूल करून शासन व प्रशासनास फसवणूक करण्याचा उद्योग सर्रास पणे सुरू आहे,प्रश्न नोकरीचा व इज्जतीचा असल्याकारणाने तसेच संस्थाचालक व मुख्याध्यापिकेची दशहत असल्याने त्यांच्याविषयी एकही शिक्षक वृंद बोलण्यास धजावत नाही त्याचप्रमाणे माजी सैनिकाच्या पत्नीस सुद्धा भविष्यात अशा प्रकारचा त्रास दिल्या जाऊ शकतो व माजी सैनिकाच्या पत्नीला व परिवाराच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो हे नाकारता येणार नाही,म्हणून संबंधित माजी सैनिकाने त्रिदल सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर यांच्याकडे न्यायासाठी लेखी तक्रार केली असल्याने संघटनेने मा. मुख्य कार्यकारी कार्यकारी  व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना भविष्यात माजी सैनिकाच्या पत्नीला व इतरही शिक्षकांना त्रास होऊ नये व संपूर्ण रक्कम मिळावी  अशा आशयाचे निवेदन सादर केले आहे व निवेदनात म्हटले आहे की, संबंधित मुख्याध्यापिका व उपशिक्षक पदावरील मुख्याध्यापिकेचे वेतन थांबवून विभागीय चौकशी करून मुख्याध्यापक व उपशिक्षक पदाची मान्यता तात्काळ रद्द करावी,माजी सैनिकांस व इतर शिक्षक वृंदांनाही न्याय मिळावा, अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर त्रिदलच्या सैनिक सेवा संघाच्या वतीने  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तरीही  न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सादर केलेल्या निवेदनावर नगर उत्तर विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सरदार , तालुकाध्यक्ष संग्रामजीत यादव, मेजर भगीरथ लक्ष्मण पवार ,अशोक साबळे , सोमनाथ ताके, रमेश अहिरे, बाबासाहेब लांडे ,कैलास खंडागळे, गोरक्षनाथ बनकर , माधव ढवळे, चंदू बडाख, वीरनारी प्रयागाबाई जाधव, मेजर कैलास कोठुळे, मेजर बाळासाहेब आंधळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
close