श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
नेवासा - आशीर्वाद फाऊंडेशन आयोजित
भव्य राज्यस्तरीय सर्व पंथीय ११ वा ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळावा नेवासा तालुक्यातील ख्रिस्त राजा चर्च, घोडेगांव या ठिकाणी रविवार दि.२८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून घोडेगांव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. आब्राहम रणनवरे, रेव्ह. फा. झेवियर, सि. प्रेमा, सि. निलमनी व प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते, ऍडव्होकेट मंगल दुशिंग, समाज कल्याण माजी सभापती राजेंद्र वाघमारे, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदे चे उपजिल्हाध्यक्ष मार्क्स बोर्डे, आदेश दुशिंग आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. फा. अब्राहाम रणनवरे यावेळी बोलताना म्हणाले की, वधू - वर परिचय मेळावा ही काळची गरज आहे. 'वर्तमानकाळात मुले व मुली उच्चशिक्षित आहेत. लग्नासाठी त्यांच्या व पालकांच्या खूपच अपेक्षा असतात. मात्र त्या पूर्ण करताना तडजोड आवश्यक असते. बाह्यरुपाला महत्त्व देण्यापेक्षा सारासार विचार केला तरच अनुरूप जोडीदार मिळून उत्तम संसार होणे शक्य असते असे ते म्हणाले.
यावेळी शाल व गुलाब वृक्ष देवून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यासाठी दिडशेहून अधिक मुले - मुली उपस्थित होते.
घोडेगाव धर्मग्रामातर्फे उपस्थितांना चहा, नाष्टा अशा अल्पोपहाररासोबत दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.
आशीर्वाद फाउंडेशन, वधू-वर सूचक मंडळ, आशिष बनसोडे अध्यक्ष, अरविंद लोखंडे सचिव, सायमन आवारे सेक्रेटरी, संजय काळपुंड उपाध्यक्ष, सॅमसन तोरणे खजिनदार, आतिष रुपेकर युवा अध्यक्ष, कुलदिप कदम व्हा. सेक्रेटरी, रविकांत लोखंडे, कर्याध्यक्ष विकास बनसोडे, रमेश साठे, दिपक कदम, रमेश क्षिरसागर
प्रमोद कटारनवरे, प्रभा भालेराव, नवनाथ आरोळे, राजश्री सगळगिळे, धिरज ओहोळ, जिवन बळीद, तर घोडेगांव धर्मग्रामातून पप्पू आल्हाट, शरद आल्हाट, गुलाबराव साळवे, पिटर बारगळ सर, संतोष गाढवे मेंबर, मेजर शिरसाठ, राजू पटेकर व जगन्नाथ लोंढे यांचे विशेष सहकार्य लाभले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111