shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सेवानिवृत्ती नंतरही स्वतःला कार्यरत राहणे हाच सुखी जीवनाचा मंञ; माजी आ.मुरकुटे


श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
अनेकजण सेवानिवृत्ती नंतर कार्यरत राहत नाहित. त्यामुळे नैराश्य येते. त्यामुळे निवृत्त झालो तरी स्वतःला कार्यरत ठेवले तर जीवन सुखकर बनते. 'रिकिमे मन शैतानाचे घर' हे ध्यानात ठेवून कोणत्या न कोणत्या कामात गुंतवून घेणे हा सुखी जीवनाचा मंञ असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

         उक्कलगाव येथील अशोक कारखान्याचे कर्मचारी बाबासाहेब तांबे हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त तालुक्यातील उक्कलगाव येथे आयोजित सेवापूर्ती समारंभानिमित्त श्री.मुरकुटे यांनी सदरचे आवाहन केले.
          सदर प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, कामगार नेते अविनाश आपटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन हिंमतराव धुमाळ, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, सरपंच रविना शिंदे, उपसरपंच नितीन थोरात, सुनिल थोरात, युवराज थोरात, कामगार संचालक गिताराम खरात, अशोक पारखे, आदींसह गावातील प्रतिष्ठित, अशोक कारखान्याचे कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. श्रीराम तांबे यांनी सूञसंचलन व आभार मानले.

*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर 
9561174111
close