shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी अमोल एडके यांची निवड


लोकहक्क फौंडेशनच्यावतीने
अमोल एडके यांचा सत्कार

शौकतभाई शेख / श्रीरामपूर
श्रीरामपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तथा तुरुंगाधिकारी (जेलर) श्री. अमोल एडके यांची तहसील अधिकारी, कर्मचारी सर्वांच्या  एकमताने श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानिमित्ताने लोकहक्क फाऊंडेशन च्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री.अमोल गोपीचंद एडके हे श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी आपले प्रशासकीय कामे, निवडणूक कामे ,समाजाचे शासकीय दरबारी असणारे विविध कामे वेळोवेळी जबाबदारीने पार पाडत आलेले आहेत. त्यांनी महसूल कर्मचारी यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत प्रयत्न केलेले आहेत.करीता सर्वानूमते त्यांची श्रीरामपूर महसूल कर्मचारी,अधिकारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे प्रांताधिकारी किरण सावंत पाटिल,तहसीलदार मिलींदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे तसेच सर्व अधिकारी ,कर्मचारी यांनी श्री.एडके यांचे अभिनंदन केले आहे.
नुकताच त्यांच्या या निवडीबद्दल लोकहक्क फौंडेशनच्या वतीने आ.लहू कानडे यांचे बंधू माजी नगरसेवक अशोकनाना कानडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण अभंग हे होते.अनेक मान्यवर मंडळीने याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. सर्वश्री दादासाहेब कांबळे, चांगदेव देवराय,दिलीप शेंडे, विठ्ठलराव देवरे,नामदेव कानडे, श्री.तुपे यांनी आपले विचार मांडले.
सदर कार्यक्रम प्रसंगी दिलीप शेंडे सर, दिलीप अभंग, सुनील सोनवणे,लक्ष्मण अभंग, विठ्ठलराव देवरे, चांगदेव देवराय ,सुरेश बोरुडे ,संतोष देवराय , धनसिंग खर्डे ,रवींद्र गाडेकर, आदिनाथ डोळस, सतीश खामकर सर ,मोहन उदमले , सुभाष एडके, संदीप शिंदे, सुरेशराव दळवी ,संजय सरोदे ,सुरेश शेंडे, बाळासाहेब बुध्दीवंत ,सुरेश छल्ले ,किरण बन्सी, सुरेश गोत्राचे ,नामदेव कानडे, सुभाष पोटे ,सुरेश भोसले, कर्णाभाऊ कापसे, रामनाथ सोनवणे ,मोहन साबळे, सुधाकर पिलगर ,अशोक खैरे, संतोष एडके, गणेश कांबळे, संजय कुमार तुपे , बाळासाहेब झारेकर कुमार कानडे ,बाबुराव वाकचौरे, अरविंद सोनवणे, कैलासराव वाघमारे, रुपेश खामकर, सचिन कांबळे, यासोबतच महिला भगीनी विजया कांबळे, निर्मला डोळस, सुनंदा शेंडे ,तसेच मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.

*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर
close