shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी २६ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
वीरशैव-लिंगायत समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाजसेवक तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना  ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार देण्यात येतो. इच्छुक संस्था व व्यक्तींनी पुरस्कारासाठी २६ जुलै २०२४ पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण  विभागाचे सहायक संचालक राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. से

  व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप

शासनाने मान्यता दिलेले  सन्मानपत्र, २५ हजार रुपये रोख, एक शाल किंवा साडी आणि श्रीफळ तसेच संस्थेसाठी शासनाने मान्यता दिलेले सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह ज्यावर संस्थेचे नाव असेल, ५१ हजार रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे असणार आहे.

    पुरस्काराच्या अटी व शर्ती तसेच विहित अर्जाच्या नमुन्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडीनाका, अहमदनगर दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२९३७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close