shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पुढची पिढी सक्षम होण्यासाठी साहित्य संमेलना आवश्यक : आमदार जगताप


अहमदनगर / प्रतिनिधी:
पुढची पिढी सक्षम होण्यासाठी साहित्य गरजेचे असून शब्दगंध च्या वतीने करण्यात येत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत, साहित्यिक आणि साहित्य रसिकांना एकत्र करून साहित्य चळवळीची दिशा निश्चित करण्याचे काम साहित्य संमेलनातून होत असतं.साहित्य संमेलन घेऊन सर्वांना विचारपिठावर संधी देण्याचे काम शब्दगंध करत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचे असे मत आमदार संग्रामभैया जगताप यांनी व्यक्त केले.

   शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी विचारपिठावर भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्रा. मधुसूदन मुळे, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, डॉ.जी.पी ढाकणे, चंद्रकांत भोसले, बापूसाहेब भोसले, ज्ञानदेव पांडुळे, शशिकांत नजान, नाट्य परिषदेचे प्रसाद बेडेकर,अमोल खोसे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार संग्रामभैया जगताप म्हणाले की, पुढच्या पिढीला वैचारिक वारसा द्यायचा असेल तर त्यासाठी पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे.शारीरिक क्षमते इतकीच वैचारिक क्षमता महत्त्वाची असून वाचनासाठी वेळ देणे गरजेचे आहे. शब्दगंध च्या वतीने राबविण्यात येत असलेले साहित्यिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. अहमदनगर शहरात सातत्याने होत असलेल्या शब्दगंध च्या कार्यक्रमाची दखल सर्वत्र घेतली जात आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यावेळी बोलताना म्हणाल्या की, साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्याचे काम शब्दगंध ने केलेले असून लिहितात त्यांना हे बळ देत आहेत. चळवळी या अचानक उदयास येत नसून त्यासाठी मोठा त्याग आणि परिश्रम करण्याची तयारी असावी लागते असे त्या म्हणाल्या.

डॉ. संजय कळमकर बोलताना म्हणाले की, साहित्यिकांनी इतरांचे वाचले तर आपले साहित्य सकस निर्माण होऊ शकते, त्यासाठी वाचायला हवे. कथा कवितांच्या कार्यशाळेतून नवनवे साहित्यिक निर्माण होऊ शकतात असे ते म्हणाले.

यावेळी प्रसाद बेडेकर,जयंत येलुलकर, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ. किशोर धनवडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

 यावेळी आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते सुनील गोसावी, भगवान राऊत व शर्मिला गोसावी  यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शब्दगंध च्या वतीने अभिवाचन स्पर्धेत सहभागी होऊन चाळीसगाव येथे सादरीकरण केल्याबद्दल सुफी सय्यद, राज्य नाट्य स्पर्धेत पहाट पक्षी नाटकाचे दिग्दर्शक संजय लोळगे व अभिनेत्री स्वानंदी भरताल, अनन्यता काव्यसंग्रहाच्या सरोज आल्हाट, कविवर्य चंद्रकांत पालवे, प्रा. मेधाताई काळे,शाहीर अरुण आहेर, सुरेखा घोलप यांच्यासह साहित्य संमेलन यशस्वी करणाऱ्या सर्व टीमचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले. शेवटी संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी आभार मानले.यावेळी ग्राहक मंचचे अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर, कॉ. नाना कदम, शब्बीर शेख, संजय भिंगारदिवे, बैचे सर, शरद गडकर,सुधीर फडके, शशिकांत गायकवाड, संतोष कानडे,शशिकांत घोडके, सरला सातपुते, प्राचार्य अशोक दौंड, अरविंद बटुळे, सत्यप्रेम गिरी, बाबासाहेब शिंदे,डॉ. रमेश वाघमारे, शिवाजी साबळे, पॉल भिंगारदिवे, कोपरगाव शाखेच्या मधुमिता निळेकर, अनिल साळवे, गणेश भगत, प्रसाद बनसोडे,जालिंदर बोरुडे, लहू दळवी, गौरव भुकन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुभाष सोनवणे यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्य संमेलनात अरविंद ब्राह्मणे, अरुण आहेर,अनिल गायकवाड, मारुती सावंत, शाहीर वसंत डंबाळे, शामा  मंडलिक, सुदर्शन धस, प्रबोधिनी पठाडे ,पांडुरंग रोडगे, दिगंबर गोंधळी, सुदर्शन धस  यांनी  कवितांचे वाचन केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष सोनवणे, शाहीर भारत गाडेकर, बबनराव गिरी, सुनील धस, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड,राजेंद्र चोभे,स्वाती ठूबे, राजेंद्र पवार, डॉ.अनिल पानखडे, डॉ.किशोर धनवटे, जयश्री झरेकर, बाळासाहेब शेंदूरकर, ऋषिकेश राऊत, हर्षली गिरी,आरती गिरी, शर्मिला रणधीर, कल्याणी  सावंत, जयश्री इंगळे, संगिता गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर,
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ, संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close