shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कमी पावसामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट- हरीशरण महाराज


*कमालपूर येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटात परमेश्वराचा आधार गरजेचा आहे.आज तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे कमी पावसाचे मोठे संकट आहे. प्रभू श्रीराम यांचे अतुल्य भक्त असलेले हनुमंतराय भगवान या संकटातून शेतकऱ्यांना नक्कीच सोडवून चांगला पाऊस पाडतील, असे आशीर्वादरुपी निरुपण ह.भ.प. हरीशरण महाराज यांनी केले.

दि. २९ रोजी कमालपूर (ता. श्रीरामपूर) येथे आयोजित श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यातील कीर्तनसेवेप्रसंगी ते उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करत होते.

कमालपूर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण झाले, हरीशरण महाराज व संदीपान महाराज यांच्या हस्ते हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व पुर्णाहुती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हरीशरण महाराज पुढे म्हणाले की,भगवंताच्या व संतांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण प्रपंचातील संकटांचा व दुःखाचा भवसागर सहजपणे पार करू शकू.यासाठी धर्माचे आचरण आणि साधू संत महात्म्यांची संगत व आशीर्वाद गरजेचे आहेत. तीन दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यात दि.२७ रोजी श्री हनुमान मूर्तीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. दि.२८ रोजी देवता स्थापन व होम हवन करण्यात आले. आज हरीशरण महाराज यांच्या कीर्तन सेवेने या सोहळ्याची सांगता झाली.याप्रसंगी माजी आ. भानुदास मुरकुटे,भास्करराव मुरकुटे,सिद्धार्थ मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, सचिन गुजर, डॉ. वंदना मुरकुटे,अरुण नाईक , सचिन मुरकुटे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी किसन मुरकुटे,नंदकुमार मुरकुटे, बाळासाहेब मुरकुटे, दिलीप मुरकुटे,बाबासाहेब मुरकुटे, भागाजी दवंगे,बाळासाहेब दवंगे,रावसाहेब मुरकुटे,रविंद्र मुरकुटे,विनायक कर्पे,अनिल गोरे यांसह श्री कृष्ण मंदिर, गुरुद्वारा कमिटी,बाजाठाण, शनी देवगाव,चेंडुफळ, घोगरगांव,भामठाण येथील भजनी मंडळ व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close