श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव अशोकनगर रोडवरील देवकर वस्ती समोरील अनेक वर्षांपूर्वीचे जांभळीचे झाड सध्या मृत्यूचे संकट बनले आहे,
सदरचे झाड हे खूप मोठे असून त्यावरील खोड व गाभा आतून पोकळ झाला असून तरीही झाड उभे असल्याचे दिसून येत आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्यात सदरचे झाड कोलमडुन पडु शकते म्हणून स्थानिक रहिवासी नागरिक यांनी सदरचे झाड शासकीय हद्दीमध्ये असून खाजगी व्यक्ती तसेच अन्य कोणी तोडू शकत नसल्याने दुर्दैवी दुर्घटनेमध्ये झाड पडल्यास रस्ता अपघात तसेच जिवीत हानी मोठी दुर्घटना होऊ शकते, याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित झाडाचे योग्य ते नियोजन करावे अशी मागणी कवी आनंदा साळवे, ग्रा प सदस्य सर्जेराव देवकर, राजेंद्र देवकर यांनी केली आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111