shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - ससाणे


 श्रीरामपूर / प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. 

श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. 
या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील  प्रत्येक महिलांना दीड हजार रुपये  महिन्याला मिळणार असून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला भगिनींना अडचण येऊ नये यासाठी ससाणे यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. 
या बैठकीदरम्यान ससाणे म्हणाले की, संघटनेतील प्रत्येक सहकार्याने घरोघरी जाऊन महिला भगिनींमध्ये या योजनेसंदर्भात जनजागृती केली पाहिजे व पात्र लाभार्थी भगिनींना या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अविवाहित, विवाहित, विधवा,परितकत्या व निराधार महिला पात्र असून या महिलांचे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक ग्राह्य धरले जाणार असून उत्पन्न दाखला अशा कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. परंतु पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे. महिलांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ससाणे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सुविधा करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली असून महिलांना १ जुलैपासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबप्रमुखाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीचा असल्यास किंवा निवृत्ती वेतन घेत असल्यास, टॅक्स भरत असल्यास अथवा अर्जदार महिलेस कोणत्याही शासकीय योजनेचा प्रति महिना लाभ मिळत असल्यास या योजनेसाठी अपात्र असणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून त्याची सुरुवात याच आठवड्यात होणार आहे. या महत्त्वाच्या योजनेपासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील कोणतीही महिला भगीनी वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ससाणे यांनी म्हटले आहे.
 यावेळी जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, प्रवीण काळे, निलेश भालेराव,आशाताई परदेशी यांनी आपल्या भाषणातून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची माहिती दिली. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर,बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरभाई शेख,माजी नगरसेवक श्रीनिवास बिहानी, रितेश रोटे, आशिष धनवटे, रमजान शहा, प्रेमचंद कुंकूलोळ, प्रवीण नवले, विलास लबडे, रावसाहेब आल्हाट, जावेद शेख, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, साईनाथ वेताळ, प्रकाश थोरात, किरण कोळसे, रितेश चव्हाणके, भोला दुग्गल, रियाजखान पठाण, सुनील साबळे, नवाज जहागीरदार, सरबजीतसिंग चुग, युनुस पटेल, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, प्रमोद भोसले, सुनील शिरसाठ, बाळासाहेब इंगळे , गणेश गायधने,सुनील शिनगारे,शिवाजी होन, पन्नालाल कुमावत, बाळासाहेब थोरात, बी. एल. साळुंके, किशोर बनकर, आबासाहेब माळी, मोहन रणवरे, सोमनाथ पाबळे, रणजीत बोडखे, संजय गोसावी, योगेश गायकवाड, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी, श्रेयस रोटे, जियान पठाण, शिवतेज गोसावी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close