shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अनुभवल्यामुळेच आम्हाला संविधान प्राणप्रिय आहे- प्राचार्य टी.ई. शेळके


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
माझा जन्म लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खुंटेगावी १७ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला, त्या काळातील इंग्रजी सत्तेची गुलामगिरी काही प्रमाणात अनुभवली.१५ ऑगस्ट१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी देश प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान म्हणजे राज्यघटनेनुसार आपण राज्यकारभार करू लागलो, त्यातून शिक्षण, व्यवसाय, नोकरी,संरकृती आणि स्वातंत्र्य यांचे
 महत्त्व लक्षात आले, प्रगती झाली, त्यामुळेच आमच्या पिढीला भारतीय संविधानाचे महत्त्व अधिक वाटते, ते नव्या पिढीने समजून घ्यावे असे आवाहन माजी प्राचार्य टी.ई. शेळके व्यक्त यांनी केले. 

        येथील विचार जागर मंचतर्फे भारतीय संविधान जनजागरण अभियान अंतर्गत रयत शिक्षण संस्थेचे, तालुक्यातील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल,पढेगांव आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य शेळके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विचार जागर मंचचे संस्थापक, सचिव डॉ. वसंत जमधडे, सदस्य डॉ. बाबुराव उपाध्ये, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व बाळासाहेब तोरणे, माजी प्राचार्य शिवाजीराव लबडे आदी उपस्थित होते. प्राचार्य राजेंद्र धरम यांनी स्वागत करून पाहुण्यांचे शाल, बुके देऊन सत्कार केले. यावेळी विद्यार्थ्याना पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधान प्रास्ताविकाचे कार्डसीट देण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अनेकांचा पुस्तके देऊन वाचन संस्कृती उपक्रम सांगितला. प्रा. गोरक्षनाथ बनकर यांनी प्राचार्य शेळके, डॉ. जमधडे, डॉ. उपाध्ये, प्राचार्य धरम, प्राचार्य लबडे
 आणि उपस्थित मान्यवरांचा गुरुपौर्णिमा निमित्ताने सत्कार केले. प्राचार्य शेळके यांनी कर्मवीर भाऊराव पाटीलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांचे शिक्षणावरील प्रेम आणि समर्पित जीवन सांगितले. शिक्षणामुळे आम्हाला नवे जग समजून घेता आले,असे अनुभव सांगून राज्यघटनेचे जीवनसूत्र सांगितले.
 डॉ. वसंत जमधडे यांनी विचार जागर मंचचा संविधान जनजागरण उपक्रम आणि आजचे विद्यार्थी यांचे नाते सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संविधान भारताचे ही कविता सादर करून संविधान ही जगण्याची प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची ज्ञानज्योत झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब तोरणे यांनी गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या गुरूजनांचा बुके देऊन त्यांच्या शाळेत सत्कार केले.यावेळी प्राचार्य धरम, प्राचार्य लबडे, बाळासाहेब लबडे, प्रा.अरविंद डोंगरेसर, प्रा सतिश उखर्डे,राजवीर बडाख यांना पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आले. बाळासाहेब तोरणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. अरविद डोंगरे यांनी केले तर प्राचार्य राजेंद्र धरम यांनी समारोप मनोगत व्यक्त करीत आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close