shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सेंट व्हिन्सेंट चर्च आगाशेनगर येथे सेंट थॉमस स्मृतीदिन उत्साहात साजरा


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 येथील सेंट व्हिन्सेंट चर्च येथे प्रेषित थॉमस यांचा  स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सकाळच्या भक्तीनंतर चर्चचे प्रमुख फादर सिजो आणि फादर फ्रँको यांच्या हस्ते प्रेषित थोमा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कदम यांनी केले. अविनाश काळे यांनी प्रेषित थोमा विषयी माहिती विशद करताना म्हणाले की, ख्रिस्ताच्या काळी इसवी सन ५२ मध्ये ख्रिस्ताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, सुवार्ता गाजविण्यासाठी  थोमा, भारतातील केरळ प्रांतात आले होते आणि, जा संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा अशी जी आज्ञा प्रभू येशूने दिली होती, त्याप्रमाणे त्यांनी कार्य केले. अत्यंत निडरपणे आणि  आत्मीयतेने त्यांनी ख्रिस्त गाजविला. योहानकृत शुभवर्तमानामधील दाखले देऊन थोमाच्या कार्याचे गुणगौरव केले. फादर सिजो यांनी,थोमाच्या निडरपणाचे गुणगौरव करून आपणही  त्याप्रमाणे निस्वार्थ ख्रिस्त गाजवण्याची गरज व्यक्त केली.

 ३ जुलै ७२ ला थोमा रक्त साक्षी झाले. त्यामुळे तीन जुलै हा थोमा यांचा स्मृती दिन म्हणून गणन्यात येतो. हा दिवस भारतीय ख्रिस्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.याप्रसंगी, डिपॉल शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर सेलिन, सिस्टर दीप्ती, सिस्टर ग्लोरिया, सिस्टर जीन्सी, सिस्टर कृपा, सिस्टर ब्लेसा, सिस्टर लिली, प्रकाश निकाळे,विश्वरंजन मकासरे, राहुल पावसे,भिकाजी कांबळे, सचिन दिवे, संतोष गायकवाड, विजय खरे, भाऊसाहेब तोरणे इत्यादी भक्तगण व डी पॉल शाळेचे शिक्षकगण उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते फादर सिजो व फादर फ्रॅंको यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व सिस्टर चा स्कार्फ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आभार प्रकाश निकाळे सर यांनी मानले.

पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर, 
संकलन: न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close