shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर डाक विभागाचा पुणे क्षेत्रात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक


पुणे विभागात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ऑल इंडिया पोस्टल व आर एम एस पेन्शनर्स असोशिएशनतर्फे श्रीरामपूर डाक अधीक्षक खडकीकर यांचा सत्कार 

श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
टपाल खात्याच्या विविध बचत, विमा तसेच डिजिटल बँकिंग या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल पुणे क्षेत्रामध्ये श्रीरामपूर डाक विभागाचा प्रथम क्रमांक आला .नुकताच पुणे येथे एका भरगच्च कार्यक्रमात महाराष्ट्र आणि गोवा राज्याची चीफ पोस्टमास्तर जनरल किशन कुमार शर्मा तसेच पुणे रिजनचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांचे हस्ते फिरता चषक प्रदान करण्यात आला. डाक अधीक्षक खडकीकर यांनी तो स्वीकारला. त्याबद्दल ऑल इंडिया पोस्टल आणि आरएमएस पेन्शनर्स असोसिएशन तर्फे डाक अधीक्षक हेमंत खडकीकर यांचा  सत्कार करण्यात आला. 

१९८० मध्ये स्थापना झालेल्या श्रीरामपूर विभागाला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घवघवीत यश मिळाले असून श्रीरामपूर डाक विभागातील सर्व कर्मचारी तसेच पेन्शनर यांच्यासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे पेन्शनर असोसिएशनचे सेक्रेटरी भाऊसाहेब शिंदे म्हणाले. यावेळी सहा. अधीक्षक संतोष जोशी, रवी कुमार झावरे, तक्रार निरीक्षक विनायक शिंदे ,विमा विकास अधिकारी विजय कोल्हे , पोस्ट मास्तर सागर आढाव  इत्यादींचा सत्कार करण्यात आला. 


ग्रामीण टपाल जीवन विमा या योजनेचा प्रसार करून पुणे क्षेत्रातील दहा वर्षे विभागांमध्ये सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विकास अधिकारी विजय कोल्हे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पेन्शनर असोसिएशनचे सेक्रेटरी भाऊसाहेब शिंदे, शशिकांत पवार ,सुदाम महाले ,एस डी कुलकर्णी, सुरेश दळवी, गोरक्षनाथ दहिवाळकर,श्री. जगझाप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

*पत्रकार राजेंद्र देसाई- वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close